राज्यातील सर्व वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य आहे.(install) एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याची मुदत आता संपली आहे. मुदत संपल्यानंतरही अनेकांनी नंबरप्लेट बसवली नाही. त्यामुळे आता कारवाई केली जाणार आहे. एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी खूप अल्प प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता कारवाई केली जाणार आहे.

१५ फेब्रुवारीपासून एचएसआरपी नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर (install) कारवाई केली जाणार असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. पुण्यात २५ लाखांपेक्षा जास्त वाहनधारकांना ही नंबरप्लेट बसवायची होती. मात्र, त्यापैकी ८ लाख ६२ हजार वाहनधारकांनी नंबरप्लेट बसवलेली आहे. फक्त १० लाख ७० हजार वाहनधारकांनी रजिस्ट्रेशन केले आहे. जवळपास १५ लाख वाहनांना नंबरप्लेट बसवलेली नाही. यानंतर आता ज्या वाहनधारकांनी नंबरप्लेट बसवली नाही त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
परिवहन विभागाने एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी चार वेळा मुदतवाढ देण्यात आली होती.(install) मुदतवाढ करुनदेखील अनेकांनी नंबरप्लेट बसवलेली नाही. यासाठी शेवटची तारीख ३१ डिसेंबर होती. मुदत संपली तरीही वाहनधारकांवर कारवाई झालेली नाही. वाहनचालकांना काही वेळ मिळावा, म्हणून कारवाई केली नव्हती. मात्र, आता १५ फेब्रुवारीनंतर वाहनधारकांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
एचएसआरपी नंबरप्लेट ही सुरक्षेच्या दृष्टीने बसवली जात आहे. (install) सर्व वाहनांना ही नंबरप्लेट बसवणे अनिवार्य आहे. यासाठी गेल्या वर्षापासून मोहिम राबवण्यात येत आहे. यानंतरही नंबरप्लेट बसवली नाही तर दंड भरावा लागणार आहे. वाहनधारकांना १००० ते १०,००० रुपये दंड भरावा लागणार आहे.
हेही वाचा :
हम दो, हमारे दो दर्जन… ओवैसींच्या पक्षाच्या नेत्याचा नारा, दिलं अजब कारण; देशभर चर्चा
प्रार्थना बेहेरेने सांगितलं मुंबई सोडण्याचं कारण, खुलासा करत म्हणाली- अनेकदा तिथे….
IND vs PAK सामन्यासाठी बांगलादेशचा भारताच्या बाजूने कौल, तर पाकिस्तानने ठेवल्या तीन अटी