सोन्याच्या दरात मोठी घसरण जाणून घ्या आजचे दर?

आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम आता सराफा बाजारात स्पष्टपणे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतीत सातत्याने घट होत असून आज या दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. विशेषतः सोन्याचे दर उच्चांकापासून लक्षणीयरीत्या खाली आल्याने ग्राहकांमध्ये खरेदीसाठी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

युद्धानंतरही दर घसरणीचा कल कायम इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या किमतींमध्ये सुरुवातीला मोठे चढ-उतार पाहायला मिळाले होते. फेब्रुवारीअखेरपर्यंत सोन्याचे दर दोन लाख रुपयांच्या आसपास पोहोचल्याचे सांगितले जात होते. मात्र, युद्धाला सुरुवात झाल्यानंतर दरांमध्ये घसरण होण्यास सुरुवात झाली. युद्ध संपल्यानंतर सोन्याचे दर पुन्हा वाढतील, असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला होता. मात्र, प्रत्यक्षात त्याउलट चित्र दिसून आले आहे. (bullion) गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमती सतत खाली येत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक वर्षासाठी सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केल्याचा उल्लेखही या पार्श्वभूमीवर करण्यात आला होता. तरीदेखील किमती कमी झाल्यामुळे ग्राहकांचा कल पुन्हा सोन्याच्या खरेदीकडे वाढताना दिसत आहे.

जळगाव सराफा बाजारात विक्रमी घट जळगाव सराफा बाजारात आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली. सोन्याच्या किमतीत तब्बल 4 हजार 600 रुपयांची घट झाली असून चांदीचे दर 15 हजार रुपयांनी खाली आले आहेत. अलिकडच्या काळातील ही मोठी घसरण मानली जात आहे. ताज्या दरांनुसार, वस्तू आणि सेवा करासह सोन्याचा भाव 1 लाख 48 हजार 948 रुपये इतका नोंदवला गेला आहे. (bullion) तर चांदीचा दर जीएसटीसह 2 लाख 38 हजार 960 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत सध्याचे दर कमी असल्याने ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी सराफा बाजाराकडे वळतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सोन्याच्या किमतीत झालेल्या या घसरणीमुळे आगामी काळात बाजारात तेजीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा :

फुटीचा शाप असलेली शिवसेना!

विधान परिषदेसाठी आज होणार मतदान?

SBI मध्ये पदवीधरांसाठी बंपर भरती जाणून अर्ज प्रक्रिया?