कर्नाटकसह गोव्यातून गांजाची होलसेल तस्करी करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषणने पुणे-बंगळूर महामार्गावर उजळाईवाडी येथील तलावाजवळ रंगेहाथ जेरबंद केले. टोळीचा म्होरक्या आणि सराईत गुन्हेगार संतोष दिनकर माने (वय ४७, रा. ढेबेवाडी, ता. पाटण), राजकिरण जयवंत मोरे (२६, रा. मालधन, ता. पाटण), सोमनाथ रघुनाथ मंडले (३६, रा. माजगाव, ता. पाटण, सातारा) अशी त्याची नावे आहेत. या तस्कराकडून २२ किलो गांजासह वाहने असा १२ लाख १७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

म्होरक्या संतोष माने पोलिस रेकॉर्डवरील सराईत आहे. (wholesale) त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड आहे. कर्नाटकसह अन्य राज्यांतून गांजाची होलसेल तस्करी करण्याचा टोळीचा फंडा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक तस्करांना गांजा पुरवठा करण्याच्या उद्देशाने उजळाईवाडी परिसरात आलेल्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकून जेरबंद केले. शहर, जिल्ह्यात नशामुक्त अभियान सुरू आहे. या काळात सातारा जिल्ह्यातील तस्करांचा गांजा उलाढालीसाठी महामार्गावरील उजळाईवाडीजवळ वावर असल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहायक निरीक्षक सागर वाघ, शेष मोरे, वैभव पाटील, संतोष बरगे यांच्यासह पथकाने रात्री उशिरा सापळा रचून टोळीला ताब्यात घेतले.
अंगझडतीत राजकिरण मोरे याच्या कब्जातून २ किलो, तर म्होरक्या संतोष माने, सोमनाथ मंडले याच्या मोटारीतून २० किलो गांजा हस्तगत करण्यात आला. (wholesale) त्यांच्या विरुद्ध गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गांजा तस्करीत स्थानिक कनेक्शनचा संशय आहे. गांजा कोठून, कोणासाठी आणण्यात आला, याची चौकशी सुरू असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.
हेही वाचा :
इंधन दरवाढ की दिलासा? पाहा आजचे पेट्रोल-डिझेलचे ताजे भाव?
1500 की 3000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर नेमके किती रुपये जमा?