टीम इंडिया सध्या अफगाणिस्तानविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळत आहे. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंडचा दौऱ्यावर जाणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ अद्याप जाहीर झालेला नाही. परंतु, या दौऱ्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. हार्दिक पांड्या अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर झाल्यानंतर, हार्दिक इंग्लंड दौऱ्यातूनही बाहेर झाला आहे. तर विराट कोहलीचा इंग्लंड दौराही अद्याप अनिश्चित आहे. कोहलीच्या फिटनेस टेस्टच्या आधारावर पुढील निर्णय घेतला जाईल. वृत्तानुसार, त्याला २२ जून रोजी बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये फिटनेस टेस्ट द्यावी लागेल.

हार्दिक पांड्या इंग्लंड दौऱ्यातून बाहेर दुखापतीमुळे हार्दिक पांड्या इंग्लंड दौऱ्यातून बाहेर पडला आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याची निवड झाली होती, (playing) परंतु मालिका सुरू होण्यापूर्वीच दुखापतीमुळे त्याला बाहेर व्हावे लागले. वृत्तानुसार, इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठीही हार्दिकची निवड होणार नाही. आयपीएल २०२६ दरम्यान तो काही सामन्यांमध्ये दिसला नव्हता. पांड्याच्या सततच्या दुखापतींमुळे भारताच्या २०२७ विश्वचषकाच्या तयारीला अडथळा येत आहे, कारण तो संघाला संतुलन देतो.
विराट कोहलीला द्यावी लागेल फिटनेस टेस्ट अहवालानुसार, विराट कोहलीला २२ जून रोजी बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे.आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यादरम्यान कोहलीला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. (playing) याच कराणामळे त्याला अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडावे लागले होते. फिटनेस टेस्ट उत्तीर्ण केल्यावर इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी विराटची निवड केली जाईल. विराट कोहलीच्या समावेशामुळे भारतीय क्रिकेट संघाची फलंदाजी अधिक मजबूत होईल. त्याने आपल्या शेवटच्या दहा एकदिवसीय डावांमध्ये तीन शतके आणि चार अर्धशतके झळकावली आहेत.
जसप्रीत बुमराह कमबॅक करणार तसेच, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पुनरागमन करू शकतो. २०२३ च्या विश्वचषक अंतिम सामन्यानंतरचा हा त्याचा पहिला एकदिवसीय सामना असेल. भारत आणि इंग्लंड १ जुलैपासून पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळतील, (playing) त्यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होईल. एकदिवसीय मालिका १४ जुलै रोजी बर्मिंगहॅममध्ये सुरू होईल आणि मालिकेतील तिसरा व अंतिम सामना लॉर्ड्सवर खेळला जाईल.
हेही वाचा :
इंधन दरवाढ की दिलासा? पाहा आजचे पेट्रोल-डिझेलचे ताजे भाव?
1500 की 3000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर नेमके किती रुपये जमा?