विराट कोहलीला धक्का: ‘या’ कारणामुळे थेट पोलिसांत तक्रार दाखल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ऐतिहासिक विजयानंतर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेमुळे क्रिकेटच्या जल्लोषाला गालबोट लागले आहे. ४ जून रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर मोठ्या संख्येने जमलेल्या चाहत्यांमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर आता आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहली(Virat Kohli) अडचणीत सापडला आहे.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एच. एम. वेंकटेश यांनी क्यूबन पार्क पोलीस ठाण्यात विराट कोहलीविरोधात(Virat Kohli) तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या मते, विराट हा कार्यक्रमाचा चेहरा होता आणि त्याची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणावर झाली होती, त्यामुळे आयोजकांवरच नव्हे तर विराटवरही जबाबदारी निश्चित केली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

३ जून रोजी आरसीबीने आयपीएल २०२५ ची ट्रॉफी जिंकत १८ वर्षांची प्रतीक्षा संपवली. या विजयाच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे ४ जून रोजी संघाच्या सत्कारासाठी एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये फ्री एंट्रीसह मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. स्टेडियमची क्षमता ३० ते ३५ हजार असतानाही हजारो चाहते अधिक आले होते.

स्टेडियम गेट बंद झाल्यानंतरही चाहत्यांची गर्दी न वाढता उलट धक्का बसला. पोलीस आणि सुरक्षारक्षकांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला आणि त्यातून चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत ११ जणांना जीव गमवावा लागला आणि अनेक जणांना गंभीर दुखापती झाल्या.

एफआयआर, अटक आणि विराटविरोधात वाढते दडपण :
या दुर्घटनेनंतर आरसीबी, केएससीए आणि डीएनए मॅनेजमेंट कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आयोजनातील हलगर्जीपणामुळे रुग्णांचे प्राण गेले, अशी नोंद एफआयआरमध्ये करण्यात आली आहे. ६ जून रोजी आरसीबीचे मार्केटिंग हेड निखिल सोसाले याला अटक करण्यात आली असून, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या तीन अधिकाऱ्यांनाही अटक झाली आहे.

या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच आता विराट कोहलीवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. विराटवर गुन्हा दाखल होतो की नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी हा धक्का असून सोशल मीडियावर यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

हेही वाचा :