तो व्हिडीओ खोटा, विश्वास ठेवू नका पेपर लीक झाल्याच्या दाव्यावर NTA चं स्पष्टीकरण?

सोशल मीडियावर NEET-UG 2026 पुनर्परीक्षेचा पेपर फुटल्याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. (claim) मात्र, या दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट करत नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने संबंधित व्हिडिओ पूर्णपणे बनावट असल्याचे जाहीर केले आहे. एजन्सीने सांगितले की, कडक सुरक्षा व्यवस्था, देखरेख आणि पारदर्शक प्रक्रियेअंतर्गत परीक्षा यशस्वीपणे पार पडली असून प्रश्नपत्रिका लीक झाल्याच्या अफवा निराधार आहेत.

रविवारी पार पडलेल्या NEET-UG 2026 पुनर्परीक्षेला देशभरातून 20 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका टेलिग्रामवर उपलब्ध झाल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला. या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा परीक्षेच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले. मात्र NTA ने तातडीने याची दखल घेत संबंधित दावे फेटाळून लावत विद्यार्थ्यांना आणि पालकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.एजन्सीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, विद्यार्थ्यांची दिशाभूल करणे, त्यांच्या मनात भीती निर्माण करणे किंवा परीक्षा प्रक्रियेबाबत चुकीची माहिती पसरवणे हा गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकारचे बनावट व्हिडिओ तयार करून प्रसारित करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत असून, (claim) यासाठी भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र (I4C) आणि कायदा अंमलबजावणी यंत्रणांची मदत घेतली जात आहे.

NTA ने विद्यार्थी आणि पालकांना परीक्षा संदर्भातील कोणतीही माहिती केवळ अधिकृत संकेतस्थळ आणि संस्थेच्या पडताळणी केलेल्या सोशल मीडिया हँडल्सवरूनच तपासण्याचा सल्ला दिला आहे. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या या परीक्षेची निष्पक्षता आणि पारदर्शकता कायम राखणे ही सर्वोच्च प्राधान्याची बाब असल्याचे एजन्सीने स्पष्ट केले. (claim) दरम्यान, यापूर्वी 3 मे रोजी झालेली NEET-UG परीक्षा पेपरफुटीच्या आरोपांमुळे रद्द करण्यात आली होती. त्या प्रकरणावरून देशभरात तीव्र राजकीय आणि सामाजिक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या पुनर्परीक्षेदरम्यान कोणतीही अफवा किंवा चुकीची माहिती पसरू नये यासाठी प्रशासन आणि परीक्षा यंत्रणा अधिक सतर्क असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा :

इंधन दरवाढ की दिलासा? पाहा आजचे पेट्रोल-डिझेलचे ताजे भाव?

1500 की 3000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर नेमके किती रुपये जमा?

फोनपे वापरण्यासाठी मोठा झटका नवीन नियम लागू?