नवीन लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर केवळ प्रोसेसरचे नाव पाहून निर्णय घेणे ही मोठी चूक ठरू शकते. i3, i5 किंवा i7 एवढ्यावरच लक्ष केंद्रित करण्याऐवजी प्रोसेसरची पिढी, (laptop) त्याचा प्रकार, रॅम, स्टोरेज, बॅटरी आणि वापराची गरज या सर्व बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. योग्य माहितीच्या आधारे लॅपटॉप निवडल्यास तुमचे पैसे वाचू शकतात आणि अनेक वर्षे उत्तम कामगिरी मिळू शकते. लॅपटॉप निवडताना सर्वप्रथम प्रोसेसरच्या नावामागील अक्षरांकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. Intel किंवा AMD प्रोसेसरमध्ये U आणि P सिरीजचे प्रोसेसर सामान्य वापर, शिक्षण, ऑनलाइन क्लासेस, ऑफिसचे काम आणि इंटरनेट ब्राउझिंगसाठी योग्य मानले जातात. या प्रोसेसरमुळे बॅटरीचा वापर कमी होतो आणि लॅपटॉप अधिक काळ चालतो. दुसरीकडे H, HS किंवा HX सिरीजचे प्रोसेसर गेमिंग, व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक्स डिझाइन आणि इतर जड कामांसाठी वापरले जातात. यामध्ये HX सिरीज सर्वाधिक शक्तिशाली मानली जाते.

एमबीए, व्यवस्थापन किंवा इतर व्यावसायिक अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेगवान आणि हलका लॅपटॉप अधिक उपयुक्त ठरतो. अशा विद्यार्थ्यांना गेमिंग लॅपटॉपची गरज नसून दीर्घकाळ बॅटरी बॅकअप, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, एक्सेल शीट्स आणि प्रेझेंटेशन हाताळू शकणारे डिव्हाइस आवश्यक असते.(laptop) त्यामुळे किमान 16 जीबी रॅम, 512 जीबी SSD आणि Intel Core i5 किंवा त्यासमान प्रोसेसर असलेला लॅपटॉप निवडण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. मल्टिटास्किंगसाठी 8 जीबी रॅम भविष्यात अपुरी पडू शकते, त्यामुळे 16 जीबी रॅम अधिक फायदेशीर ठरते.स्क्रीनच्या बाबतीत 14 ते 15 इंचाचा डिस्प्ले शिक्षण आणि कार्यालयीन कामांसाठी सर्वात सोयीचा मानला जातो. OLED डिस्प्ले असल्यास चित्रांची स्पष्टता, रंग आणि वाचनाचा अनुभव अधिक चांगला मिळतो. तसेच सतत प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी 1.8 किलोपेक्षा कमी वजनाचा आणि किमान 8 ते 10 तास बॅटरी बॅकअप देणारा लॅपटॉप निवडावा.
ऑपरेटिंग सिस्टमच्या बाबतीत Windows आधारित लॅपटॉप हे Microsoft Office, Excel, PowerPoint आणि Teams यांसारख्या व्यावसायिक साधनांसाठी अधिक उपयुक्त ठरतात. मात्र, ॲपलच्या इकोसिस्टममध्ये काम करण्याची सवय असल्यास MacBook Air M2 हा देखील एक उत्कृष्ट पर्याय आहे. हलके वजन, उत्कृष्ट बॅटरी बॅकअप आणि आकर्षक स्क्रीनमुळे हा लॅपटॉप विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहे.सुमारे 70 हजार रुपयांच्या बजेटमध्ये अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. Samsung Galaxy Book 4 (Core i5) हा दैनंदिन वापरासाठी सक्षम आणि हलका पर्याय मानला जातो. HP OmniBook 5 i5 हा लॅपटॉप दीर्घकाळ काम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि व्यावसायिकांसाठी उपयुक्त आहे. Acer Swift Neo OLED AI हा आकर्षक डिस्प्ले आणि कमी वजनामुळे कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.
बजेटची अडचण नसल्यास Samsung Galaxy Book 4 Edge AI आणि Lenovo Yoga Slim 7 यांसारखे प्रीमियम लॅपटॉपही विचारात घेता येतात. विशेषतः 32 जीबी रॅम आणि 1 टीबी स्टोरेज असलेले Lenovo Yoga Slim 7 हे डेटा अॅनालिटिक्स, संशोधन आणि मल्टिटास्किंग करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मानले जाते.गेमिंग आणि अभ्यास दोन्ही गोष्टींचा समतोल साधायचा असल्यास गेमिंग लॅपटॉपचा पर्याय निवडता येईल. मात्र, हे लॅपटॉप तुलनेने जड असतात आणि त्यांची बॅटरी लवकर संपते, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. (laptop) त्यामुळे खरेदीपूर्वी स्वतःच्या गरजा, बजेट आणि वापराचा प्रकार लक्षात घेऊनच अंतिम निर्णय घेणे अधिक फायदेशीर ठरेल.
हेही वाचा :
इंधन दरवाढ की दिलासा? पाहा आजचे पेट्रोल-डिझेलचे ताजे भाव?
1500 की 3000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर नेमके किती रुपये जमा?