श्रद्धा कपूरच्या अडचणी वाढल्या नेमकं काय घडलं?

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्या आगामी ‘ईठा’ या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आणि त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राच्या लोककलेचा वारसा पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतानाच, हा चित्रपट आता एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटाचे नाव ‘ईठा’ ठेवण्यावर राजकीय स्तरातून तीव्र आक्षेप घेण्यात आला असून, (Bollywood) थेट नाव बदलण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावरील चित्रपट हा चित्रपट महाराष्ट्रातील दिग्गज तमाशासम्राज्ञी आणि लावणी क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व स्व. विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनसंघर्षावर आधारित आहे. विठाबाईंनी आपल्या कलेच्या जोरावर लावणी आणि तमाशा या लोककलांना जागतिक स्तरावर एक नवी ओळख मिळवून दिली आणि त्यांना राष्ट्रपती पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. (Bollywood) इतक्या महान कलावंताच्या बायोपिकचे नाव ‘ईठा’ ठेवल्याने वादाची ठिणगी पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट आणि सांस्कृतिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी यासंदर्भात एक अधिकृत पत्रक जारी करून निर्मात्यांकडे स्पष्ट मागणी केली आहे अभिमानास्पद निर्मिती, पण नावावर आक्षेप: विठाबाईंच्या जीवनावर चित्रपट बनवणे ही महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी अभिमानाची गोष्ट आहे, पण चित्रपटाचे शीर्षक ‘ईठा’ ठेवणे कोणत्याही दृष्टीने योग्य वाटत नाही. ‘विठाबाई’ नावाचा आग्रह: या दिग्गज कलावंताचा आणि त्यांच्या कलेचा योग्य सन्मान राखला जावा यासाठी निर्मात्यांनी ‘ईठा’ हे नाव त्वरित बदलून ‘विठाबाई’ किंवा ‘विठा’ असे ठेवावे, जेणेकरून प्रेक्षक त्यांच्या इतिहासाशी थेट जोडले जाऊ शकतील.

नेटकऱ्यांकडून मात्र विरोध अमान्य; दिले ‘हे’ लॉजिक राजकीय स्तरातून या नावावर आक्षेप घेतला जात असला, तरी सोशल मीडियावरील युजर्स आणि श्रद्धा कपूरच्या चाहत्यांना हा विरोध फारसा रुचलेला नाही. नेटकऱ्यांनी या वादावर आपली मते मांडताना चित्रपटाच्या नावाचे समर्थन केले आहे: ग्रामीण बोलीभाषेचा आदर: अनेक युजर्सचे म्हणणे आहे की, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आजही अनेकांचे पूर्ण नाव न घेता आपुलकीने हाक मारण्याची पद्धत आहे. तिथे ‘विठा’ या नावाचा उच्चार अनेकदा ग्रामीण बोलीभाषेत ‘ईठा’ असाच केला जातो.मातीशी असलेला ऋणानुबंध: चित्रपटाचे नाव ‘ईठा’ ठेवणे म्हणजे विठाबाईंचा अनादर नसून, उलट त्यातून त्यांचा मातीशी असलेला घट्ट ऋणानुबंध आणि गावाकडची साधी-भोळी, अस्सल बोलीभाषा अधोरेखित होते, असे लॉजिक चाहत्यांनी मांडले आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि रणदीप हुड्डा, नाना पाटेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट २८ ऑगस्ट २०२६ रोजी रिलीज होणार आहे. (Bollywood) आता या वाढत्या वादामुळे निर्माते चित्रपटाचे नाव बदलणार की ‘ईठा’ याच नावाने चित्रपट थिएटरमध्ये येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

इंधन दरवाढ की दिलासा? पाहा आजचे पेट्रोल-डिझेलचे ताजे भाव?

1500 की 3000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर नेमके किती रुपये जमा?

फोनपे वापरण्यासाठी मोठा झटका नवीन नियम लागू?