रामायण चित्रपटाच्या ट्रेलरची तारीख अखेर जाहीर दिवशी होणार प्रदर्शित?

रणबीर कपूर आणि यश यांच्या बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटाच्या ट्रेलरची चाहत्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. निर्मात्यांनी अधिकृतपणे ट्रेलर प्रदर्शित होण्याची तारीख आणि वेळ जाहीर केली असून शुभ ब्रह्ममुहूर्तावर जगभर हा ट्रेलर प्रदर्शित केला जाणार आहे. याआधी ट्रेलरचे प्रदर्शन पुढे ढकलल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली होती.

चित्रपटाच्या निर्मात्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत 30 जुलै 2026 रोजी, गुरुवारी पहाटे 4.15 वाजता ‘रामायण’चा ट्रेलर जगभर प्रदर्शित केला जाणार असल्याची घोषणा केली आहे. शुभ ब्रह्ममुहूर्तावर या महाकाव्याचा प्रारंभ करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे. (Ramayana) यापूर्वी 24 जुलै रोजी ट्रेलर प्रदर्शित होणार होता. मात्र देशभरातील विद्यार्थी आंदोलन आणि सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंटसोबत सुरू असलेल्या वितरण प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर ट्रेलरचे जागतिक प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. निर्माता नमित मल्होत्रा यांनी याबाबत माहिती देताना जागतिक स्तरावरील प्रदर्शनाच्या तयारीसाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले होते. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात प्रथमच ‘रामायण’ची जागतिक पातळीवर मोठ्या हॉलीवूड चित्रपटाप्रमाणे रिलीज करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘रामायण’ हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. दोन्ही भागांसाठी जवळपास 4,000 कोटींचे बजेट निश्चित करण्यात आले आहे. नमित मल्होत्रा यांनी सांगितले की, हा चित्रपट जगातील सर्वात भव्य सिनेमांपैकी एक बनवण्याचे उद्दिष्ट असून भारतीय संस्कृती आणि रामायणाची कथा जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत (Ramayana) असलेल्या या चित्रपटात रणबीर कपूर भगवान श्रीराम यांच्या भूमिकेत, यश रावणाच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत आणि रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार असून पहिला भाग ऑक्टोबर 2026 मध्ये दिवाळीपूर्वी जगभर रिलीज होईल, तर दुसरा भाग दिवाळी 2027 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा :

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर शरद पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया म्हणाले?

बदली, मानधनी १,१९८ कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेचा निर्णय लांबणीवर?

सांगलीत साखरे सोबत गूळाच्या दरातही वाढ?