पंचवीस हजार रुपये लाचेची मागणी, शाहूपुरी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल?

कौटुंबिक वादातून दाखल झालेल्या गुन्ह्यातील तपास आणि जामिनासाठी मदत करतो (registered) म्हणून तक्रारदार यांच्याकडून 25 हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक अपर्णा सुखदेव जाधव ( वय 35, राहणार कळंबा ता – करवीर, मुळगाव हातनोली ता – तासगाव) हिच्या विरुद्ध गुरुवारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

लाच प्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने कोल्हापूर पोलीस दलात खळबळ माजली आहे. संशयित पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव हिला अध्याप अटक झाली नाही. लाच लुचपत प्रतिबंध पथकाचे अधिकारी त्यांचा शोध घेत आहेत. महिला पोलीस अधिकारी जाधव हिला लवकरच अटक करण्यात येईल असे लाच लुचपत प्रतिबंधक पथकाचे पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांनी सांगितले.पोलीस सूत्राकडून सांगण्यात आले की, मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पतीमध्ये कौटुंबिक कारणातून तीव्र मतभेद निर्माण झाले होते. दि. २ जून रोजी सकाळी महिला सहायक पोलीस निरीक्षक आणि त्यांचे पती यांच्यात हमरी तुमरी झाली. (registered) रागाच्या भरात पतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेल्या पत्नीवर हल्ला केला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. याप्रकरणी संशयित पतीवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. शाहूपुरी पोलिसांनी संबंधित पतीला अटक केली होती. या गुन्ह्याची चौकशी पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव यांच्याकडे होती.

या गुन्ह्यात तपास आणि जामीन्यासाठी मदत करतो असे सांगून पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव हिने यापूर्वी 25 हजार रुपये स्वीकारले होते. आता जामीन झाल्यानंतर उर्वरित 25 हजार रुपयासाठी त्यांचा तागादा सुरू होता. तक्रारदार व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव हिच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. चार दिवसांपूर्वी लाचलुचपत पथकाने शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या आवारात सापळाही लावला होता.(registered) मात्र त्याची कुण कुण लागताच जाधव हिने रक्कम स्वीकारली नव्हती. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने तक्रारीची पडताळणी केली. चौकशीत अपर्णा जाधव हिने तक्रारदार यांच्याकडे स्वतःच्या फायद्यासाठी 25 हजार रुपयाची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न होतात अपर्णा जाधव हिच्याविरुद्ध आज (दि.25) सकाळी शाहूपुरी पोलीस ठाण्यात लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा :

इंधन दरवाढ की दिलासा? पाहा आजचे पेट्रोल-डिझेलचे ताजे भाव?

1500 की 3000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर नेमके किती रुपये जमा?

फोनपे वापरण्यासाठी मोठा झटका नवीन नियम लागू?