2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात राहुल गांधी (Lok Sabha elections) यांनी त्यांच्या संपत्तीबाबत सविस्तर माहिती दिली आहे. या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांनी एकूण 20.39 कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली असून 2019 मध्ये ही रक्कम 15.88 कोटी रुपये होती. म्हणजेच गेल्या पाच वर्षांत त्यांच्या संपत्तीत सुमारे 5 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
प्रतिज्ञापत्रात नमूद केल्याप्रमाणे, मागील पाच वर्षांत त्यांचे एकूण उत्पन्न सुमारे 6 कोटी रुपये आहे. त्यांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा गुंतवणूक आणि इतर स्रोतांमधून येतो. त्यांच्या ताब्यात केवळ 55 हजार रुपये रोख असून दोन बँक खात्यांमध्ये मिळून 26.25 लाख रुपये जमा असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

गुंतवणुकीच्या बाबतीत त्यांनी 25 कंपन्यांमध्ये शेअर्स (Lok Sabha elections) घेतले असून त्यांची एकूण किंमत 4.33 कोटी रुपये आहे. तसेच सात म्युच्युअल फंडांमध्ये 3.81 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. याशिवाय सुमारे 15 लाख रुपयांचे सोन्याचे बाँड त्यांच्या नावावर आहेत. विमा पॉलिसींमध्ये 61.52 लाख रुपयांच्या ठेवी असून 4.20 लाख रुपयांचे सोने आणि दागिने त्यांनी जाहीर केले आहेत. त्यांच्या जंगम मालमत्तेची एकूण किंमत 9.24 कोटी रुपये असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद आहे.
स्थावर मालमत्तेच्या स्वरूपात त्यांनी 11.15 कोटी रुपये किंमतीची (Lok Sabha elections) मालमत्ता घोषित केली आहे. यात दिल्लीतील मेहरौली परिसरातील सुलतानपूर गावातील शेतजमिनीचा समावेश आहे. ही जमीन त्यांनी बहीण प्रियांका गांधी यांच्यासोबत संयुक्तरित्या खरेदी केली आहे. तसेच त्यांच्या नावावर कोणतेही वाहन नोंदणीकृत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा :
महेंद्रसिंह धोनीवर मोठा अन्याय, सत्य समजताच येईल संताप, खळबळजनक माहिती समोर!
मोठी बातमी! बीजेपीचा बांगलादेशमध्ये झेंडा, लोकसभेची एक जागा जिंकली