कोल्हापूर मध्यरात्रीचा काळोख, निर्मनुष्य रस्ता आणि खोल शेतात उलटलेली कार… अशा भीषण प्रसंगात भल्याभल्यांची मती गुंग व्हावी. मात्र, नागाव (ता. हातकणंगले) येथील अवघ्या सात वर्षांच्या राजवर्धन अश्विन जाधव याने दाखवलेले प्रसंगावधान संपूर्ण कुटुंबासाठी जीवदान ठरले. कारची काच फोडून बाहेर पडत (Midnight) त्याने रस्त्यावरील वाहने थांबवली आणि कुटुंबीयांना मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढले.

नागाव येथील मोरे आणि जाधव कुटुंबीय वांगी येथील अंबिका देवीच्या महाप्रसादाचा कार्यक्रम आटोपून कारने (एम.एच. ०२ बीझेड ०५४०) गावाकडे निघाले होते. कारमध्ये सुनीता जाधव, चिमुकला राजवर्धन आणि कुटुंबातील इतर पाचजण होते. रविवारी (दि. २५) रात्री अकराच्या सुमारास आमणापूर-अंकलखोप रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट आठ ते दहा फूट खोल शेतात जाऊन उलटली.
अपघातानंतर कारमध्ये अंधार, जखमा आणि भीतीमुळे एकच आरडाओरड सुरू झाली. बाहेर पडायचा मार्ग बंद झाला होता. (Midnight) अशा बिकटप्रसंगी इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या राजवर्धनने जराही धीर सोडला नाही. त्याने प्रसंगावधान राखून कारची काच फोडली आणि कसाबसा बाहेर पडला. रडत बसण्याऐवजी त्याने तत्काळ रस्त्याकडे धाव घेतली. भररात्री अंधारात हात दाखवून त्याने ये-जा करणाऱ्या वाहनांना थांबवले. चिमुरड्याची धडपड पाहून थांबलेल्या वाहनचालकांनी शेतात धाव घेत कारमधील सर्वांना बाहेर काढले. नागरिकांच्या समयसूचकतेमुळे सर्व सदस्य सुखरूप बचावले. ज्या वयात मुले अंधाराला घाबरतात, (Midnight) त्या वयात राजवर्धनने दाखविलेल्या धाडस आणि प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी एसटी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, दिवाळीपूर्वी वेतनाचा मार्ग मोकळा
फोनमध्ये SIM नसेल तर WhatsApp बंद होणार का काय होणार नेमका बदल