कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
पदवीधर आणि शिक्षक या विधान परिषद मतदार संघामध्ये आत्तापर्यंत पैशाचा प्रभाव दिसून आलेला नाही आणि या मतदारसंघातील मतदारांनी सुद्धा आपल्या मताची नाळ अर्थकारणाशी जोडलेली नाही. पण यंदा प्रथमच या निवडणुकीत पैशाचा प्रभाव प्रचंड प्रमाणावर वाढलेला दिसला आहे.

या निवडणुकीपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक झाली . महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी ही लढत झाली आणि (Legislative) अगदी अनपेक्षितपणे महाविकास आघाडीच्या सतेज पाटील यांनी ही निवडणूक 13 विरुद्ध 12 अशा मतांनी जिंकली. गोकुळ दूध संघामधील निवडणुकीचा हा कौल
भाजप विरोधी असल्याची त्यानंतर चर्चा सुरू झाली. एकदा दुधाने तोंड भाजले म्हणून मग ताक सुद्धा फुंकून प्यायचे, असा सावध पवित्रा या निवडणुकीत भाजप अर्थात महायुतीने घेतला होता. (Legislative) त्यामुळे पैशाचा प्रभाव वाढला. पदवीधर मतदार संघात बहुतांशी मतदारांपर्यंत प्रत्येकी तीन हजार रुपये अशी पाकिटे वाटण्यात आली. तर शिक्षक मतदारसंघात हाच दर दहा हजार रुपयांपर्यंत गेला होता अशी चर्चा आहे. आता हा पैशाचा खेळ एकतर्फी नव्हता. दोन्ही बाजूंनी मतदारांना आमिष दाखवले नाही तर दिले गेले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतेज पाटील यांनी तर माध्यमांशी बोलताना मतदारांना मोठ्या प्रमाणावर लक्ष्मी दर्शन घडवून आणलेले आहे असा आरोप केला आहे. त्यांचा अंगुली निर्देश महायुतीकडे आहे. महायुती जिंकली तर त्याला काहीतरी कारण असले पाहिजे यासाठीची त्यांची ही पूर्वतयारी आहे काय?
विधान परिषदेच्या पाच जागा असल्या तरी त्या विभागीय असल्यामुळे किमान 20 जिल्ह्यातील मतदारांनी मतदानात भाग घेतला आहे त्याचा अर्थ 50% महाराष्ट्र या निवडणुकीशी जोडला गेला आहे. फेरी निहाय वैध आणि अवैध मतांचे गठ्ठे करणे, त्यानंतर पहिल्या पसंतीची मते मोजणे, द्वितीय पसंतीची मते मोजणे, अशी ही मतमोजणी प्रक्रिया आहे. (Legislative) त्यामुळे मतमोजणीस वेळ लागतो. आणि म्हणूनच अधिकृत निकाल जाहीर होण्यासाठी विलंब लागणार आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी एसटी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, दिवाळीपूर्वी वेतनाचा मार्ग मोकळा
फोनमध्ये SIM नसेल तर WhatsApp बंद होणार का काय होणार नेमका बदल