मोठी बातमी या दोन खासदारांची वर्णी, थेट मिळणार केंद्रात मंत्रिपद?

केंद्रीय मंत्रिमंडळात काही महत्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. राज्यातील खासदारांची वर्णी लागू शकते. शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी करून आलेल्या खासदारांना थेट केंद्रीय मंत्री होण्याची संधी आहे. (possibility) दोन जणांना संधी दिली जाऊ शकते. तश्या घडामोडीही सुरू आहेत.

केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला. केंद्र सरकारकडून मंत्रिमंडळात काही मोठे बदल केले जातील. येत्या दोन ते तीन दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. शिवसेनेला केंद्रात मोठे बक्षीस मिळण्याची शक्यता सूत्रांकडून देण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन विस्ताराबाबत चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. (possibility) ठाकरे गटातून एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केलेला 6 खासदारांचे नशिब उजळणार आहे. थेट केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होऊ शकतो. हे मोठे बक्षीय दिले जात आहे. उद्धव ठाकरे गटातील 6 खासदार एनडीएमध्ये आणल्याबद्दल शिवसेनेला बक्षीस मिळण्याची शक्यता असून खासदार श्रीकांत शिंदे यांना शिक्षण कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे.

श्रीकांत शिंदे यांच्यासोबतच संजय बंडू जाधव यांच्याकडे आरोग्य राज्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. प्रतापराव जाधव यांच्याकडे केवळ आयुष खाते राहण्याची शक्यता आहे. माजी आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे शिक्षण (HRD) खाते जाण्याची शक्यता आहे.अनुराग ठाकूर यांचे कॅबिनेटमध्ये पुनरागमन होण्याची शक्यता आहे. यादरम्यानच मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. राज्यातील खासदारांना थेट केंद्रात मंत्री होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटातून बंडखोरी करणाऱ्या खासदारांना एकप्रकारे मोठे बक्षिसच दिले जात आहे. (possibility) याबाबत निर्णय देखील झाल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात 6 खासदारांनी प्रवेश केला.बंडखोरीच्या मुद्द्यात शिवसेना ठाकरे गटाकडून व्हिप जारी करण्यात आले. या व्हिपनंतर 6 खासदार बैठकीला दाखल होतील, अशी अपेक्षा शिवसेना ठाकरे गटाला होती. मात्र, या 6 खासदारांनी बैठकीला दांडी मारली. लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गटाची स्थापना करण्याबाबत त्यांनी पत्र दिले. ज्यानंतर मुंबई दाखल होत त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. आता या खासदारांना मोठे बक्षीस मिळणार असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा :

राजकीय खळबळ विलास घुले खून प्रकरणात खासदार पुत्राला अटक होणार?

घटसर्प आणि धनुर्वातीची लस घेतली १६ वर्षाच्या मुलीचा बेशुद्ध पडून मृत्यू?

श्रद्धा कपूरच्या अडचणी वाढल्या नेमकं काय घडलं?