डोनाल्ड ट्रम्प हे परराष्ट्र धोरण आपल्या पद्धतीने चालवतात. अमेरिकेच्या वर्षानुवर्षाच्या पॉलिसीशी त्यांना काही देणंघेणं नाही. हे ट्रम्प यांनी कित्येकदा दाखवून दिलय. आता त्यांनी असाच एक वादग्रस्त निर्णय घेतलाय. (Donald Trump) त्यामुळे इस्रायल संकटात येणार आहे. भारताच्या शत्रुचं बळ ते वाढवणार आहेत. हा देश पाकिस्तान नाही.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तुर्कीला 700 मिलियन डॉलर (जवळपास 5800 कोटी रुपये) फायटर जेटचे इंजिन विक्रीच्या व्यवहाराला मंजुरी दिली आहे. तुर्कीच्या एअरफोर्सचे आधुनिकीकरणासाठी प्रयत्न सुरु आहेत. अमेरिकी खासदारांनी तुर्की सोबतच्या या संरक्षण कराराला विरोध केला आहे. ही डील काय आहे? तुर्कीचा फायदा काय? अमेरिकेत का विरोध होतोय? जाणून घ्या. ट्रम्प प्रशासनाने अमेरिकी कंपनी ‘जनरल इलेक्ट्रिक ’ ने बनवलेलं जेट इंजिन तुर्कीला विकायला परवानगी दिली आहे. हा सौदा 700 मिलियन डॉलरपेक्षा अधिकचा आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने 24 जूनला या संदर्भात काँग्रेसला नोटिफिकेशन पाठवलं. राजकीय, सैन्य, आर्थिक आणि मानवाधिकाराशी संबंधित बाबी ध्यानात घेऊन सरकारने हे निर्यात लायसन्स देण्याचा निर्णय घेतला आहे.
संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता हे तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तैयप एर्दोगन यांचं मुख्य लक्ष्य आहे. 2016 मध्ये तुर्कीने पाचव्या पिढीचं फायटर जेट बनवण्याचा प्रोजेक्ट सुरु केला. याला KAAN असं नाव दिलं. डिफेंस एक्सपर्ट्सनुसार तुर्की स्वत:च फायटर जेट बनवत आहे. पण त्याच्या उड्डाणासाठी अत्याधुनिक इंजिनची गरज आहे. (Donald Trump) अशी इंजिन्स फक्त अमेरिकेकडूनच मिळू शकतात. अमेरिकी इंजिनविना KAAN प्रोजेक्ट ठप्प पडू शकतो. सध्या तुर्कीच्या एअर फोर्सकडे जुनी होणारी अमेरिकेची F-16 फायटर विमानं आणि बायरकतार सारखे देशांतर्गत ड्रोन्स आहेत. एअरफोर्सला अत्याधुनिक बनवणं ही एर्दोगन यांची टॉप प्रायोरिटी आहे.
डेमोक्रेटिक पार्टीचे नेते या डीलचा विरोध करत आहेत. याचं कारण 2019 च्या एका निर्णयाशी संबंधित आहे. 2019 मध्ये तुर्कीने अमेरिकेने इशारा देऊनही रशियाकडून S-400 एअर डिफेन्स सिस्टिम विकत घेतली. म्हणून अमेरिकेने तुर्कीवर प्रतिबंध लादले. (Donald Trump) त्यांना F-35 फायटर प्रोग्रॅममधून बाहेर केलं. अमेरिकी कायद्यानुसार तुर्कीकडे जर S-400 सिस्टिम असेल तर त्यांना F-35 विकता येणार नाही. तुर्कीजवळ S-400 सिस्टिम असणं हे धोकादायक आहे असं नाटो आणि अमेरिकेचं मत आहे. दोन्ही सिस्टिम एकत्रित असल्याने रशिया F-35 ची सिक्रेट टेक्नोलॉजीची माहिती चोरु शकतो.
तुर्कीला F-35 फायटर जेट मिळू नये म्हणून इस्रायल दीर्घकाळापासून अमेरिकेत लॉबिंग करत आहे. आम्ही आमच्या पायलट्सना सर्वोत्तम शस्त्रास्त्र देणं सुरु ठेवू. त्याचवेळी काही लोकांना ही शक्ती मिळू नये हे सुद्धा सुनिश्चित करु असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू मागच्यावर्षी बोलले होते. 2023 मध्ये गाजा युद्ध सुरु झाल्यापासून एर्दोगन यांनी इस्रायल विरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. अलीकडेच इस्रायलला रोखलं पाहिजे असं ते बोलले होते. तुर्कीची एअरफोर्स अत्याधुनिक झाली, तर मध्य पूर्वेतील शक्ती संतुलन बिघडेल ही इस्रायलच्या मनात भिती आहे.
हेही वाचा :
राजकीय खळबळ विलास घुले खून प्रकरणात खासदार पुत्राला अटक होणार?
घटसर्प आणि धनुर्वातीची लस घेतली १६ वर्षाच्या मुलीचा बेशुद्ध पडून मृत्यू?