पवार कुटुंबात पुन्हा एकदा विवाहसोहळ्याची लगबग सुरू झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या (preparations) कन्या रेवती यांच्या विवाहानंतर आता दिवंगत नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या साखरपुड्याची तयारी सुरू आहे. 29 जुलै रोजी हा सोहळा होणार असून, पुण्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पार्थ पवार आणि कायनात धार यांच्या साखरपुड्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. दोघांचा साखरपुडा 29 जुलै रोजी पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलची निवड करण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र, ज्या हॉटेलमध्ये हा सोहळा होणार आहे, त्या हॉटेलचे नेमके नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. (preparations) त्यामुळे कार्यक्रमाचे ठिकाण जाणून घेण्यासाठी अनेकांची उत्सुकता वाढली आहे. या खास सोहळ्यासाठी पवार कुटुंबाकडून जय्यत तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. साखरपुड्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व आमदार आणि खासदारांना निमंत्रण देण्यात आले आहे. याशिवाय काही मोजक्या माजी आमदारांनाही या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे पवार कुटुंबातील या कौटुंबिक सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
पार्थ पवार यांच्या साखरपुड्यासाठी पक्षातील नेत्यांसोबतच काही विशेष पाहुण्यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य पक्षांमधील प्रमुख नेत्यांना देखील या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. (preparations) त्यामुळे राजकीय वर्तुळातील कोणकोणते नेते या कौटुंबिक सोहळ्याला उपस्थित राहतात, याकडे लक्ष लागले आहे.दरम्यान, हा कार्यक्रम अत्यंत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. पवार कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि राजकीय क्षेत्रातील नेतेमंडळी मिळून साधारण 200 ते 250 जण या सोहळ्यात सहभागी होण्याची शक्यता आहे. पार्थ पवार हे कायनात धार यांच्याशी विवाह करणार असून, त्याआधी 29 जुलै रोजी दोघांचा साखरपुडा होणार आहे. त्यामुळे पवार कुटुंबातील या आगामी सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
दिवसा होणार अंधार, ऑगस्ट महिन्यात मोठे सूर्यग्रहण, तब्बल इतके तास?
नीटनंतर MPSC चा महत्वाचा पेपर फुटल्याचा धक्कादायक दावा, संपूर्ण राज्यात खळबळ?