कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
आमदार रोहित पवार यांनी अजितदादांच्या विमाना अपघाताबद्दल समस्येचं (demands)वादळ निर्माण केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे वगैरे यांनी आता या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. संबंधित विमान कंपनीचे मालक रोहित सिंग यांच्याशी सत्ताधाऱ्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याचा गंभीर आरोप होऊ लागल्यानंतर सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली आहे. रोहित पवार यांनी बुधवारी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन काही नवीन मुद्दे उपस्थित केले आहेत. यातील काही मुद्दे हे तांत्रिक आहेत आणि काही मुद्दे तर्कशास्त्रावर आधारित आहेत. त्यांनी मांडलेले मुद्दे बे दखल करावेत असे नाहीत.बारामती विमानतळा नजीक झालेला हा दुर्दैवी अपघात, त्यातून निर्माण झालेले प्रश्न हे केवळ रोहित पवार यांनी जनतेसमोर आणलेले आहेत. त्यांनी या प्रकरणाचा एक प्रकारे समांतर तपासच केला आहे असे म्हणता येईल. त्यांनी काही नवीन संशयास्पद बाबी समोर आणल्या आहेत. ते शरद पवार गटाचे आमदार असले तरी अजित दादा हे त्यांचे काका आहेत. त्यामुळेच मी उपस्थित केलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळणार नाहीत तोपर्यंत मी शांतपणे झोपणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

ब्लॅक बॉक्स जळाली असल्याचे म्हटले जात आहे. (demands)मात्र अकराशे फेरन हिट उष्णतेमध्ये सुद्धा ब्लॅक बॉक्स ला काहीही होत नाही असे विमान विषयक तज्ञांचे म्हणणे आहे. विमान क्रॅश झाल्यानंतर तीन स्फोट झाले आहेत. या स्फोटाची कारणे काय?विमानातील टॉयलेटच्या भागात म्हणजे जवळपास शेपटी जवळ ब्लॅक बॉक्स असते. या शेपटीजवळ इंधनाचा अतिरिक्त साठा होता. मुंबई ते बारामती हा छोटा प्रवास असताना विमानात अतिरिक्त इंधन का ठेवण्यात आले होते? विमानातील सर्वांचा अगदी काही क्षणात मृत्यू झाला. शरीराचे अवयव तुटून उडाले. मृतदेहांचा कोळसा झाला होता. मात्र कागदपत्रे जळाली नाहीत हे कसे?पायलट सुमित कपूर हे आर्थिक दृष्ट्या अडचणीत आले होते. त्यांच्या पगारात मोठी कपात करण्यात आली होती. त्यांचा विमान चालवण्याचा परवाना दोन वेळा निलंबित करण्यात आला होता. त्यांना दारूचे व्यसन होते. ते डिप्रेशन मध्ये गेले होते. त्यादिवशी साहिल मैदान यांच्याकडे विमान चालवण्याची जबाबदारी होती मात्र ऐनवेळी ती बदलून सुमित कपूर यांच्याकडे का देण्यात आली?
इंधनाचा अतिरिक्त साठा विमानात ठेवताना विमान क्रश झाल्यानंतर (demands)त्या इंधनाने पेट घ्यावा आणि ब्लॅक बॉक्स जळून जावीयासाठी पूर्वतयारी करण्यात आली होती काय? व्ही एस आर विमानांचं भारतात रजिस्ट्रेशनच होत नाही तर मग ती भारतात का उडवली जातात? असे काही नवीन प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केले आहेत आणि त्यांनी ते अभ्यास करून पुढे आणलेले आहेत याबद्दल कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. अपघात ग्रस्त विमान ज्या कंपनीचे होते त्या व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंग हे अपघात झाल्यानंतर अचानक परदेशात का गेले आहेत? हा प्रश्नही योग्य आहे. कारण अतिशय गांभीर्याने या अपघाताचा तपास सुरू असताना मालकाने प्रदेशात जाणे हे संशयास्पद आहे. अजित दादा पवार यांना पक्षांतर्गत काही ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना एकटे पाडले होते. त्यामुळे अजित दादा अस्वस्थ होते. सत्तेतील काही जणांचे व्हीएसआर कंपनीच्या मालकाशी संबंध आहेत असा आरोप करताना रोहित पवार यांनी अजितदादा गटाच्या काही नेत्यांकडे संशयाची सुई फिरवली आहे. त्यामुळेच या अपघात प्रकरणी तो केवळ अपघात आहे असे सांगणारे आता सीबीआय चौकशीची मागणी करू लागले आहेत हे इथे लक्षात घेतले पाहिजे.
सुमित कपूर हा पायलट डिप्रेशन मध्ये होता. त्याची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. (demands) याचा फायदा घेतला गेलेला नाही असे म्हणता येणार नाही. त्याच्याकडून अपघात घडवून आणलेला आहे असे रोहित पवार यांचे म्हणणे आहे. म्हणूनच या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने झाला पाहिजे याचा आग्रह धरणे अपेक्षित आहे.अतिशय योग्य पद्धतीने तपास करण्यासाठी भारतीय यंत्रणा सक्षम आहेत याबद्दलही कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही.रोहित पवार हे अजित दादा पवार यांचे पुतणे आहेत. या अपघाताची चौकशी निपक्षपातीपणे आणि सक्षमपणे झाली पाहिजे आणि त्यासाठी काही प्रश्न उपस्थित करणे हे दादांचे पुतणे म्हणून त्यांचे कामच आहे. आणि ते अभ्यासपूर्वक करत आहेत.अशावेळी भाजपच्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी रोहित पवार यांच्या कडून सुरू असलेल्या समांतर तपासाला”हे धंदे आता बंद करा”असे म्हणण्याची काही गरज नव्हती.
हेही वाचा :
महेंद्रसिंह धोनीवर मोठा अन्याय, सत्य समजताच येईल संताप, खळबळजनक माहिती समोर!
मोठी बातमी! बीजेपीचा बांगलादेशमध्ये झेंडा, लोकसभेची एक जागा जिंकली