200 रुपयांचा सर्वात भारी रिचार्ज प्लान, काय आहेत फायदे?

बाजारात २०० रुपयांचे रिचार्ज प्लान देखील उपलब्ध आहेत. कोणत्या कंपनीचे रिचार्ज प्लान सर्वात भारी आहेत, जाणून घ्या

Jio, Vodafone Idea आणि Airtel जवळ प्रीपेड युजर्ससाठी २०० रुपयांचा भारी रिचार्ज प्लान आहे. (Recharge) परंतु कोणत्या कंपनीचा रिचार्ज प्लान सर्वात भारी आहे, हे जाणून घ्या. चुकीचा रिचार्ज प्लान निवडून पैसे वाया घालवण्याऐवजी माहिती जाणून घ्या. 200 रुपयांच्या रिचार्ज प्लानचे फायदे जाणून घ्या.

रिलायन्स जिओचा 198 रुपयांचा रिजार्च प्लानममध्ये दिवसाला २ जीबी हायस्पीड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि प्रतिदिन 100 एसएमएस मिळतात. त्याचबरोबर प्लानमध्ये अनलिमिटेड 5जी डेटा देखील मिळतो. 14 दिवसांची व्हॅलिडिटी असलेल्या प्लानमध्ये अतिरिक्त फायदे देखील आहेत. य प्लानमध्ये जिओ टीव्ही आणि जिओ एआय क्लाउड स्टोरेज चा देखील फायदा मिळतो.व्होडाफोन आयडियाच्या 199 रुपयांच्या व्होडाफोन आयडिया प्लानसोबत एकूण २ जीबी डेटा देखील मिळतो. (Recharge) तसेच तुम्हाला 300 एसएमएस देखील मिळतात. रिचार्जसोबत 28 दिवसांची व्हॅलिडिटी देखील मिळते. या प्रीपेड प्लानसोबत ‘व्हीआय मुव्हीज अँड टीव्ही’ची सुविधा मिळते. या व्यतिरिक्त अनलिमिडेट कॉलिंगचा फायदा मिळतो.

एअरटेलच्या 199 रुपयांच्या एअरटेल रिचार्ज प्लानमध्ये फक्त 2 जीबी डेटा, अनलिमिडेट कॉलिंग, प्रतिदिन 100 एसएमएस मिळतात. 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह मिळणाऱ्या प्रीपेड प्लानमध्ये इतर सुविधा देखील मिळतात. तुम्हाला Adobe Express चा देखील प्रीमिअम मिळतो. यासहित फ्री हॅलोट्यून आणि एअरटेल एक्सट्रीम प्लेचा देखील फायदा मिळतो. तिन्ही प्लानचे फायदे तुमच्या निवडीवर आहेत. जिओच्या (Jio) प्लानमध्ये व्हॅलिडीटी कमी दिवसांची मिळते. परंतु या प्लानमध्ये दिवसाला 2 जीबी डेटा मिळतो. तुम्ही इंटरनेट अधिक वापरात असाल, तर तुमच्यासाठी जिओचा प्लान योग्य राहील. इंटरनेटशिवाय इतर सुविधांसाठी एअरटेल आणि व्हीआय कंपनीचा प्लान तुम्हाला आवडण्याची शक्यता आहे. तिन्ही रिचार्ज प्लान चांगलेच आहेत. परंतु तुमच्या गरजेनुसार रिचार्ज प्लान निवडणे फायद्याचे ठरेल. (Recharge) तसेच तुम्ही योग्य प्लान निवडला तर तुमच्या पैशांची देखील बचत होईल.

हेही वाचा :

इंधन दरवाढ की दिलासा? पाहा आजचे पेट्रोल-डिझेलचे ताजे भाव?

1500 की 3000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर नेमके किती रुपये जमा?

फोनपे वापरण्यासाठी मोठा झटका नवीन नियम लागू?