Ind-US ट्रे़ड डील फायनल होणार? डोनाल्ड ट्रम्प लवकरच भारत दौऱ्यावर, परराष्ट्र मंत्र्यालयाने नेमकं काय सांगितलं?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे २०२७ च्या सुरुवातीला भारत दौऱ्यावर येणार असल्याची माहिती अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी दिली आहे. (Ind-US) ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या तयारीला अंतिम रूप देण्यासाठी आपण लवकरच भारतात येणार असल्याचेही रुबियो यांनी सांगितले. या दौऱ्याकडे भारत-अमेरिका संबंधांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

मार्को रुबियो यांनी सांगितलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात चांगले संबंध आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यातील बहुप्रतिक्षित व्यापार करार अंतिम टप्प्यात असून काही मोजके मुद्दे सोडवायचे बाकी आहेत.(Ind-US) तसंच ऊर्जा पुरवठा वाढवण्यावरही दोन्ही देश एकत्र काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.भारतामधील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनीही भारत आणि अमेरिका हे नैसर्गिक भागीदार असल्याचे सांगितले आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापार, संरक्षण आणि गुंतवणूक क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. मोदी आणि ट्रम्प यांच्यातील विश्वासाचे संबंध हे द्विपक्षीय सहकार्याचा मजबूत पाया असल्याचेही त्यांनी म्हटलं.

डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधी फेब्रुवारी २०२० मध्ये भारताचा दौरा केला होता. अहमदाबादमधील ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमात त्यांनी पंतप्रधान मोदींसोबत सहभाग घेतला होता. (Ind-US) त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये अनेकदा दूरध्वनीवर चर्चाही झाली आहे. अलीकडेच फ्रान्समध्ये झालेल्या G7 परिषदेदरम्यान दोघांची प्रत्यक्ष भेट झाली होती.या भेटीत व्यापार करार, संरक्षण सहकार्य आणि होर्मुझ परिसरात कार्यरत भारतीय नाविकांच्या सुरक्षेसह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली होती. ट्रम्प यांनी भारतासोबतचा व्यापार करार लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला होता. त्यामुळे २०२७ मधील त्यांचा प्रस्तावित भारत दौरा दोन्ही देशांतील संबंधांना आणखी बळकटी देणारा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

इंधन दरवाढ की दिलासा? पाहा आजचे पेट्रोल-डिझेलचे ताजे भाव?

1500 की 3000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर नेमके किती रुपये जमा?

फोनपे वापरण्यासाठी मोठा झटका नवीन नियम लागू?