राजस्थानातील उदयपूर शहर पुन्हा एकदा ग्लॅमर आणि राजेशाही थाटाच्या (glamour) चर्चेत आले आहे. दक्षिण चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. येत्या 26 फेब्रुवारीला उदयपूरमधील एका आलिशान रिसॉर्टमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या वृत्ताला अद्याप दोन्ही कलाकारांच्या कुटुंबीयांकडून किंवा अधिकृत प्रतिनिधींनी दुजोरा दिलेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, अरावली पर्वतरांगांच्या (glamour) कुशीत वसलेल्या ITC Mementos Ekaaya Udaipur येथे हा शाही सोहळा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निसर्गरम्य परिसर, भव्य वास्तुकला आणि आलिशान सुविधा यामुळे हे ठिकाण डेस्टिनेशन वेडिंगसाठी विशेष पसंतीस उतरले आहे. हॉटेलच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार, ‘व्हॅली व्ह्यू व्हिला’ प्रकारातील खोलीचे एका रात्रीचे भाडे सुमारे 26 हजार रुपयांपासून सुरू होते. ‘अरावली सूट’साठी सुमारे 55 हजार रुपये मोजावे लागतात, तर ‘ममेंटोस सूट’चे दर 75 हजार ते 88 हजार रुपयांदरम्यान आहेत. या दरांवरून संभाव्य विवाहसोहळ्याची भव्यता लक्षात येते.

उदयपूर हे पूर्वीपासूनच ग्रँड वेडिंगसाठी ओळखले जाते. (glamour) याआधी अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राजकारणी राघव चड्ढा यांनी येथे विवाहसोहळा पार पाडला होता. त्यामुळे रश्मिका आणि विजय यांच्या लग्नाच्या चर्चेमुळे शहर पुन्हा एकदा सेलिब्रिटी वेडिंगच्या झगमगाटात न्हाऊन निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रश्मिका आणि विजय यांच्या नात्याबाबत मागील काही वर्षांपासून विविध चर्चा सुरू होत्या. दोघांनी एकत्र केलेल्या चित्रपटांनंतर त्यांच्या केमिस्ट्रीची चाहत्यांमध्ये मोठी चर्चा झाली होती. आता लग्नाच्या चर्चांमुळे चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. अधिकृत घोषणा होईपर्यंत मात्र या शाही सोहळ्याबाबतची उत्सुकता कायम राहणार आहे.

हेही वाचा :

अल्पवयीन मुलांना सोशल मीडियावर बंदी? केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय?

टीम इंडियाचा पहिला पराभव, ऑस्ट्रेलिया विरुद्ध मोठी संधी गमावली, काय झालं?

एपस्टीन फाइल्स प्रकरणात सर्वात मोठी अटक! या दिग्गजावर कारवाई होताच जगात खळबळ