आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सातत्याने चढ-उतार सुरू असतानाच, सरकारी तेल विपणन कंपन्यांनी 30 जून 2026 रोजी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. अमेरिका-इराण तणाव, जागतिक पुरवठा साखळी आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर भारतातील इंधनाचे दर वाढणार का, (petrol and diesel) याकडे वाहनधारकांचे लक्ष लागले होते. मात्र, आज सकाळी 6 वाजता जाहीर झालेल्या दरांनुसार प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

प्रमुख शहरांतील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर
दिल्ली: पेट्रोल ₹102.12 | डिझेल ₹95.20 प्रति लिटर
मुंबई: पेट्रोल ₹111.21 | डिझेल ₹97.83 प्रति लिटर
कोलकाता: पेट्रोल ₹113.51 | डिझेल ₹99.82 प्रति लिटर
चेन्नई: पेट्रोल ₹108.01 | डिझेल ₹99.66 प्रति लिटर
हैदराबाद: पेट्रोल ₹115.73 | डिझेल ₹103.82 प्रति लिटर
बंगळुरू: पेट्रोल ₹110.89 | डिझेल ₹98.80 प्रति लिटर
स्थानिक व्हॅट आणि इतर करांमुळे प्रत्येक राज्यातील इंधनाच्या किमतींमध्ये फरक दिसून येतो. (petrol and diesel) कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढल्या आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत पुन्हा 73 डॉलर प्रति बॅरलच्या वर, तर WTI क्रूड सुमारे 70 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास व्यवहार करत आहे. अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे जागतिक तेल बाजारात पुन्हा अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनीसंदर्भातील घडामोडींवर जगभरातील बाजारपेठेचे लक्ष असून, त्याचा कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या सरकारी तेल कंपन्यांनी किरकोळ इंधन दरात कोणताही बदल केलेला नसला, तरी आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर पुढील निर्णय अवलंबून राहणार आहे. (petrol and diesel) दरम्यान, पेट्रोलियम मंत्रालयाच्या माहितीनुसार, तेल कंपन्यांवरील आर्थिक ताण पूर्वीपेक्षा कमी झाला आहे. आंतरराष्ट्रीय किमती आणि देशांतर्गत दरांमधील तफावत कमी झाल्यामुळे भविष्यात इंधन दरांबाबत सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज सकाळी 6 वाजता अपडेट केले जातात. स्थानिक करांमुळे प्रत्येक शहरातील दर वेगवेगळे असू शकतात.
हेही वाचा :
मी बोलायला लागलो, तर सहन होणार नाही..!
महाबळेश्वरला जाताय तर सावधान पर्यटकांसाठी प्रसिद्ध पॉईंट बंद?
Jio आणि Airtel यूजर्स सावधान Gmail खात्याबाबतची ही चूक ठरू शकते धोकादायक?