महागाईचा दणका, थेट सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी वाढ, तब्बल?

सीएनजीच्या ग्राहकांना मोठा दणका बसला आहे. त्यातच आता मोठी माहिती पुढे येत आहे. सीएनजीच्या दरात मोठी वाढ करण्यात आली. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे.

महागाईचा दणका सर्वसामान्य लोकांना मोठ्या प्रमाणात बसतोय. इराण आणि अमेरिका युद्धात अनेक गोष्टींची दरवाढ झाली. ज्यानंतर सातत्याने महागाई वाढताना दिसत आहे. इराण आणि अमेरिका युद्धात एलपीजी गॅसची मोठी समस्या होती. (CNG and PNG) त्यानंतर अनेक खाद्यविक्रेत्यांनी पदार्थांच्या किमती वाढवल्या. मात्र, त्यानंतर सीएनजी स्वस्त झाला पण किमती तशाच राहिल्या. आता सीएनजीच्या दरात मोठी वाढ करण्यात आली. सर्वसामान्यांना मोठा दणका बसला आहे. मुंबईकरांना महिन्याच्या सुरुवातीलाच मोठा फटका बसला आहे. शहरात सीएनजी (CNG) आणि पीएनजी (PNG) या दोन्ही इंधनांच्या दरात वाढ झाली आहे. महानगर गॅस लिमिटेडने (MGL) सर्व भागांमध्ये सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ केली आहे.

आजपासून 1 सप्टेंबर 2026 पासून मुंबईत सीएनजीचा नवीन दर प्रति किलो 88 रुपये झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील परिस्थितीमुळे गॅसच्या खरेदी खर्चात झालेली वाढ पाहता, घरगुती पीएनजीच्या दरातही प्रति एससीएम (SCM) 1 रुपयाने वाढ करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सीएनजीच्या किमतीत मोठी वाढ होत आहे.मध्य पूर्वेतील देशाच्या संकटामुळे आंतरराष्ट्रीय निर्देशांकांशी गॅसच्या किमतीमध्ये लक्षणीय वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर, एमजीएलने सीएनजीच्या दरांमध्ये वाढ केली आहे. सध्या भारतात सीएनजीला मोठी मागणी असून ही मागणी पूर्ण करण्यासाठी अधिकचा साठा मागवण्यात आला आहे. (CNG and PNG) नवीन दर आज 1 सप्टेंबर 2026 पासून लागू करण्यात आली आहेत. अमेरिकेने पुन्हा इराणवर हल्ला केला. अमेरिकेने इराणवर केलेल्या या हल्ल्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झपाट्याने वाढ झाली.

पुन्हा जागतिक बाजारात कच्चे तेल भडकल्याचे बघायला मिळत आहे. कच्चे तेलाचे भाव वाढल्याने भारतीय तेल कंपन्यांवरील तणाव वाढला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्येही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. काही महिन्यात चारवेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली. त्यातच सीएनजीचे दरही वाढले आहेत. (CNG and PNG) यासोबतच साखरेच्याही दरात मोठी वाढ झाली. देशात महागाई सतत वाढताना दिसत आहे. ज्यामुळे सर्वसामान्यांच्या घराचे बजेट बिघडताना दिसतंय.

हेही वाचा :

CNG दर वाढल्याने ऑटोचालकांचा ९ सप्टेंबरला संपाचा इशारा, केली मोठी मागणी?

राजकारणात खळबळ बडा नेता देणार राजीनामा तारीखही केली जाहीर?

एअरपोर्टवर अमित शाह-एकनाथ शिंदेंची गुप्त भेट १० मिनिटांच्या चर्चेने राजकीय चर्चांना उधाण?