नागरिकांनो सावधान पेट्रोल भरताना झिरोसोबत दोन गोष्टी तपासा?

पेट्रोल पंपावर इंधन भरताना मीटर शून्यावरून सुरू झाला आहे की नाही, याची खात्री अनेक वाहनचालक करतात. मात्र केवळ हीच तपासणी पुरेशी नसल्याचे पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याच्या व्हायरल व्हिडिओतून सांगण्यात आले आहे. भेसळ किंवा मापातील संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी इंधनाची डेंसिटी आणि मीटरची हालचाल या दोन बाबी बारकाईने पाहणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे.

गाडीमध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरताना आपल्याला योग्य प्रमाणात आणि शुद्ध इंधन मिळत आहे की नाही, याबाबत अनेकदा वाहनचालकांच्या मनात शंका असते. ही फसवणूक टाळण्यासाठी काही जण नेहमीच्या 100, 200 किंवा 300 रुपयांच्या ऐवजी 110, 210 किंवा 310 रुपयांचे इंधन भरतात. मात्र केवळ वेगळी रक्कम निवडल्यामुळे पेट्रोल पंपावरील संभाव्य गैरप्रकार टाळता येतोच असे नाही, असा दावा संबंधित कर्मचाऱ्याने केला आहे. (petrol pump) त्याऐवजी इंधनाची गुणवत्ता आणि मशीनवरील मोजमाप याकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्याने सांगितले.

पेट्रोल पंपावरील डिजिटल मशीनवर इंधनाची डेंसिटी म्हणजे घनता दर्शवली जाते. संबंधित कर्मचाऱ्याच्या माहितीनुसार, पेट्रोलची डेंसिटी 720 ते 775 या मर्यादेत असणे अपेक्षित आहे, तर डिझेलसाठी ती 820 ते 860 दरम्यान असावी. मशीनवर दिसणारी डेंसिटी या प्रमाणाच्या बाहेर असल्यास इंधनामध्ये भेसळ असण्याची शक्यता तपासणे आवश्यक ठरते. (petrol pump) त्यामुळे पेट्रोल किंवा डिझेल भरून घेण्यापूर्वी ग्राहकांनी केवळ रक्कम आणि शून्याची स्थिती न पाहता मशीनवर दिसणाऱ्या डेंसिटीकडेही लक्ष द्यावे.

इंधन भरण्यापूर्वी मीटरवर शून्य दिसत आहे की नाही, हे पाहणे नक्कीच आवश्यक आहे. मात्र त्यानंतर मीटर ज्या पद्धतीने पुढे सरकतो, त्याकडेही ग्राहकांनी लक्ष द्यावे, असे या व्हायरल व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे. 110 किंवा 210 रुपयांचे पेट्रोल भरल्याने मापातील संभाव्य गैरप्रकार आपोआप टळत नाहीत. खरी बाब इंधन वितरण सुरू झाल्यानंतर मीटरच्या रीडिंगमध्ये कशी वाढ होते, यामध्ये असू शकते. त्यामुळे पेट्रोल पंपावर उभे असताना मशीनच्या रीडिंगवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरते.

पेट्रोल भरण्यास सुरुवात झाल्यानंतर मीटरने 0 नंतर 2, 3, 4 अशा क्रमाने सलग पुढे जाणे अपेक्षित आहे. मात्र रीडिंग 0 वरून थेट 10, 12 किंवा 15 अशा आकड्यांवर उडी मारत असल्याचे दिसल्यास मशीनमध्ये काही फेरफार झाला आहे का, याबाबत संशय निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत ठरलेल्या रकमेच्या तुलनेत कमी प्रमाणात इंधन मिळण्याची शक्यता असल्याचे कर्मचाऱ्याने सांगितले. (petrol pump) त्यामुळे पुढील वेळी पेट्रोल पंपावर जाताना फक्त झिरो तपासून थांबण्याऐवजी डेंसिटीची योग्य रेंज आणि मीटरची सलग हालचाल या दोन्ही बाबी काळजीपूर्वक पाहणे आवश्यक आहे. या दोन गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास भेसळयुक्त इंधन किंवा मापातील संभाव्य फसवणुकीचा धोका निर्माण होऊ शकतो.

हेही वाचा :

इचलकरंजीतही धावणार पंतप्रधान ई-बस १० बसेस लवकरच दाखल, यंत्रणा उभारणी गतीने?

सांगली बलात्कार व लूटप्रकरणी आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी?

 शिराळ्यात पिसाळलेल्या कुत्र्याचा सहाजणांना चावा?