कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही समाजहिताला, समाज कल्याणला महत्त्व देणारी, समाजात मूल्य संस्कार रुजावेत यासाठी प्रयत्न करणारी संघटना आहे. तिची स्थापना होऊन 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. आणि वंदे मातरम या राष्ट्रगीताने शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त समारंभात वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी भाषण केले. त्याबद्दल राज ठाकरे यांच्यासह काही राजकीय नेत्यांनी तीव्र शब्दात नाराजी नव्हे तर संताप व्यक्त केला आहे. (importance) त्याचे एका मर्यादेपर्यंत स्वागत करायला हवे.

शासकीय अधिकारी विशेषतः प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी त्यांची कर्तव्य आणि शिस्त याबद्दलची आचारसंहिता आहे. राजकीय किंवा सामाजिक संघटनांच्या समारंभाला तसेच व्यासपीठावर त्यांनी उपस्थित राहू नये असे संकेत. किरण बेदी, मीरा बोरवणकर, अरविंद इनामदार, जे. एफ. रिबेरो या गाजलेल्या लोकप्रिय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात (सांस्कृतिक कार्यक्रम वगळता) हजेरी लावली नव्हती. भाषणे केली नव्हती. (importance) त्यापैकी काहींनी सेवानिवृत्त झाल्यानंतर आत्मचरित्रे लिहिली आहेत. त्यात त्यांनी राजकीय नेत्यांचे अनुभव सुद्धा कथन केले आहेत. या पार्श्वभूमीचा विचार केला तर विश्वास नांगरे पाटील यांची संघाच्या कार्यक्रमातली उपस्थिती निश्चितच खटकते.
विश्वास नांगरे पाटील यांनी संघाच्या कार्यक्रमाला एप्रिल महिन्यात हजेरी लावली होती आणि आता त्यांची नागपूर शहराचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यानंतर एप्रिल महिन्यातील त्यांच्या भाषणाबद्दल टीका होताना दिसते आहे. संघाच्या कार्यक्रमात त्यांनी केलेले भाषण आणि त्यानंतर त्यांची झालेली नियुक्ती याचा परस्परांशी संबंध लावला जात नाही ना? कारण संघाचे मुख्यालय असलेल्या रेशीम बागेचा परिसर हा नागपूर शहरात येतो. म्हणून त्यांच्यावर टीका केली जात आहे काय? तशी राजकीय भूमिका त्या टिकेमागे नसावी अशी अपेक्षा करूया.
शासनाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्या प्रशासकीय सेवेतील, भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम वगळता अन्य कोणत्याही राजकीय तसेच सामाजिक संघटनांच्या समारंभांना किंवा कार्यक्रमांना उपस्थित राहू नये असे संकेत आहेत आणि ते बहुतांशी पाळले जातात.अशा अधिकाऱ्यांच्यासाठी अशा प्रकारचे संकेत देणारी आचारसंहिता नसेल तर
प्रशासनात शिस्त राहणार नाही. (importance) म्हणूनच विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांच्या संघाच्या कार्यक्रमाच्या उपस्थितीबद्दल कितीही खुलासा केला तरी तो समर्थनीय नाही. कोणत्याही सामाजिक संघटने कडून किंवा विश्वस्त मंडळाकडून पुरस्कार जाहीर झाला तर तो स्वीकारायचा नाही असेही संकेत आहेत. इचलकरंजी येथील फाय फाउंडेशन चा स्मृतिचिन्ह व रोख रक्कम असलेला पुरस्कार तत्कालीन आयपीएस अधिकारी माधव सानप यांना जाहीर झाला होता मात्र त्यांनी तो स्वीकारला नाही.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात विश्वास नांगरे पाटील यांनी उपनिषिदे तसेच ज्ञानेश्वरांच्या पसायदानावर भाषण केले. असा खुलासा त्यांनीच केला आहे. त्यांचे हे भाषण सांस्कृतिक मंचावरून झाले असते तर त्याबद्दल कोणीच हरकत घेतली नसती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देश हिताला सर्वोच्च प्राधान्य देणारी संघटना असली तरी काँग्रेस तसेच तत्सम राजकीय पक्षांकडून संघावर कायम टीका केली जाते. अशा संघाच्या व्यासपीठावर आयपीएस अधिकारी जाऊन भाषण करतो हे संबंधित राजकीय पक्षांना रुचलेले नाही. ते या घटनेकडे राजकीय भूमिकेतून पहात असतील तर त्यांचे हेतू स्पष्टपणे पुढे येतात. पण राजकारणाच्या पलीकडे जाऊन या घटनेकडे पाहिले पाहिजे. महायुती मधील एक ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी तर विश्वास नांगरे पाटील यांचे कौतुक करताना त्यांनी संघ शाखेत रोज आले पाहिजे अशी प्रतिक्रिया देऊन एका वेगळ्या चर्चेला आमंत्रण दिले आहे. सर्वसामान्य जनतेच्या दृष्टिकोनातून विश्वास नांगरे पाटील यांची कृती समर्थनीय नाही. त्यांनी खुलासा केला असला तरी!
हेही वाचा :
मी बोलायला लागलो, तर सहन होणार नाही..!
महाबळेश्वरला जाताय तर सावधान पर्यटकांसाठी प्रसिद्ध पॉईंट बंद?
Jio आणि Airtel यूजर्स सावधान Gmail खात्याबाबतची ही चूक ठरू शकते धोकादायक?