पंचगंगेवरील दोन पुलांचा प्रश्न रखडला अनेक गावांचा विकास ठप्प?

शिरढोण पंचगंगा नदीवरील टाकवडे–अब्दुललाट पूल आणि शिरढोण–कुरुंदवाड मार्गावरील पर्यायी पुलाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. (Panchganga) दोन्ही पुलांसाठी शासनाने तातडीने निधी मंजूर करून काम सुरू करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

टाकवडे–अब्दुललाट पूल गेल्या ३० वर्षांपासून केवळ निवडणुकीच्या आश्वासनापुरताच मर्यादित राहिला आहे. प्रत्येक निवडणुकीत पुलाचे आश्वासन दिले जाते, मात्र निवडणूक संपल्यानंतर हा विषय पुन्हा थंडावतो. दोन वर्षांपूर्वी कोंडीग्रे–जांभळी–टाकवडे मार्गे पंचगंगा नदीवर पूल उभारण्यासाठी सुमारे २५ कोटी रुपयांचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आला. (Panchganga) मात्र निधीअभावी तो अद्याप मंजूर झालेला नाही. हा पूल झाल्यास टाकवडे ते अब्दुललाट हे अंतर अवघ्या दोन किलोमीटरवर येईल. सध्या नागरिकांना दहा ते अकरा किलोमीटरचा वळसा घालावा लागतो. टाकवडे, अब्दुललाट, शिरढोण, जांभळी, नांदणीसह तालुक्यातील अनेक गावांतील नागरिकांना या पुलाचा थेट फायदा होणार आहे. शेतकऱ्यांचा शेतीमाल इचलकरंजी, जयसिंगपूर, सांगली, मिरज तसेच कर्नाटकातील चिकोडी व बेळगाव बाजारपेठेत कमी वेळेत पोहोचेल. विद्यार्थी, रुग्ण, व्यापारी आणि नोकरदारांचाही प्रवास सोयीचा होईल.

दुसरीकडे, शिरढोण–कुरुंदवाड मार्गावरील सध्याचा पूल कमी उंचीचा असल्याने दरवर्षी पावसाळ्यात पुराचे पाणी पुलावरून वाहते. (Panchganga) त्यामुळे हा मार्ग अनेक दिवस बंद राहतो आणि नागरिकांना मोठा फेरा मारावा लागतो. आपत्कालीन सेवा, रुग्णवाहिका आणि शालेय विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसतो. त्यामुळे या ठिकाणी उंच पर्यायी पूल उभारण्याची मागणीही जोर धरत आहे.पर्यायी पूल ही काळाची गरज… शिरढोण–कुरुंदवाड मार्गावरीलसध्याचे पूल दरवर्षी पुराच्या पाण्याखाली जात असल्याने वाहतूक बंद पडते. टाकवडे–अब्दुललाट पूल झाल्यास ११ गावांचा संपर्क सुलभ होईल. त्यामुळे दोन्ही ठिकाणी पुलांची उभारणी करून नागरिकांची गैरसोय कायमची दूर करावी.

हेही वाचा :

शेतकऱ्यांनो कर्जमाफी यादीत नाव कसं तपासाल?

पीएफ खातेधारकांसाठी नवीन नियम, पेन्शनबाबतही मोठे बदल?

धाड धाड कोसळले तेलाचे भाव, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती थेट?