ऐन सणासुदीच्या काळात गृहकर्जदारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) आगामी पतधोरण बैठकीत रेपो दरात 25 बेसिस पॉईंटची वाढ करण्याचा विचार केला जाऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. SBI Research ने रेपो दरात वाढ करण्याचा सल्ला दिल्याने कर्जदारांच्या चिंतेत भर पडली आहे.

SBI Research च्या अंदाजानुसार, ऑक्टोबरमध्ये रेपो दरात 25 बेसिस पॉईंटची वाढ होऊ शकते. (banks) त्यानंतर डिसेंबरमध्येही आणखी 25 बेसिस पॉईंट वाढ करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. RBI च्या पतधोरण समितीची बैठक 5 ते 7 ऑक्टोबरदरम्यान होण्याची शक्यता आहे. सध्या रेपो दर 5.25 टक्क्यांवर असून, मागील चार बैठकींमध्ये तो कायम ठेवण्यात आला आहे.
कच्च्या तेलाच्या किमती आणि महागाईचा दबाव यामुळे व्याजदर वाढवण्याची गरज निर्माण होऊ शकते, असा SBI Research चा अंदाज आहे. रेपो दरात 25 बेसिस पॉईंट म्हणजेच 0.25 टक्क्यांची वाढ झाल्यास तो 5.25 टक्क्यांवरून 5.50 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो.रेपो दराचा थेट परिणाम बँकांच्या कर्जदरावर होतो. विशेषतः फ्लोटिंग व्याजदरावर घेतलेल्या गृहकर्जाचा EMI वाढू शकतो किंवा कर्जाचा कालावधी वाढण्याची शक्यता असते.(banks) गृहकर्जासोबतच वाहन कर्जासारख्या इतर कर्जांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.
उदाहरणार्थ, एखाद्या ग्राहकाने 20 वर्षांसाठी 50 लाख रुपयांचे गृहकर्ज 8 टक्के व्याजदराने घेतले असेल, तर त्याचा EMI अंदाजे 41,822 रुपये होतो. हाच व्याजदर 8.25 टक्के झाल्यास EMI अंदाजे 42,619 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. (banks) म्हणजेच दरात 25 बेसिस पॉईंटची वाढ झाल्यास या उदाहरणात मासिक EMI सुमारे 797 रुपयांनी वाढू शकतो. मात्र प्रत्यक्ष परिणाम कर्जाची रक्कम, उर्वरित कालावधी, बँकेचा व्याजदर आणि संबंधित बँकेच्या धोरणावर अवलंबून असेल.महत्त्वाचे म्हणजे, SBI Research ने रेपो दर वाढवण्याचा सल्ला दिला असला तरी RBI ने ऑक्टोबरमधील संभाव्य दरवाढीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे कर्जदारांनी अंतिम निर्णयासाठी RBI च्या पतधोरणाच्या घोषणेची प्रतीक्षा करणे आवश्यक आहे.
हेही वाचा :
शेतकऱ्यांनो, ₹२००० खात्यात जमा झाले नाही? इथं करा तक्रार, २४ वा हप्ता होईल लगेच जमा?
हाती पैसा येणार, रखडलेली कामं मार्गी लागणार ५ राशींना मिळणार?