कांकेर: छत्तीसगड राज्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. वेगाने जाणारी कार(car) काम सुरू असलेल्या पुलाला जाऊन धडकली. हा अपघात नेमका कसा घडला आहे ते जाणून घेऊयात. छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात मध्यरात्री भीषण अपघात घडला आहे. एक वेगाने जाणारी कार काम सुरू असलेल्या पुलाला जाऊन धडकली आणि त्या कारला भीषण आग लागली.

गाडीला आग लागल्याने यामधून प्रवास करणाऱ्या 6 प्रवाशांपैकी 4 जणांचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात कांकेर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग ३० वर मध्यरात्री घडला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, घडले असे की, एक कार अनियंत्रित झाल्याने पुलाला जाऊन धडकली. त्यात 6 पैकी 4 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. हे युवक मुरमेड वरून कांकेरल जात होते.
समोर आलेल्या माहितीनुसार, ही कार इतक्या वेगात होती की, अनियंत्रित झाल्यानंतर ड्रायव्हरला गाडी कंट्रोल करणे हे अवघड झाले. त्यामुळे ही कार(car) थेट पुलाला जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की गाडीला तत्काळ आग लागली. या घटनेत 6 पैकी 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले असून, वेगवेगळ्या भागातून दररोज अपघाताच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भरधाव कारच्या धडकेत एका सायकल चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुणे स्टेशन परिसरात हा अपघात झाला आहे.

याप्रकरणी पसार झालेल्या चालकावर बंडगार्डन पोलिसांनी गु्न्हा दाखल केला. रामप्रतापसिंग महेसिंग राजावत (वय ५२, रा. भैय्यावाडी, ताडीवाला रस्ता) असे मृत्यू झालेल्या सायकल चालकाचे नाव आहे. याबाबत बिनीत सिंग (वय ४२, रा. वडाचीवाडी, उंड्री ) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सोलापूरहून तडवळच्या दिशेने जाताना हत्तूर शिवारातील नाईकवाडी यांच्या शेताजवळ कार(car) उलटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारखाली सापडून डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी मध्यरात्री झाला आहे. आशिष इरण्णा पनशेट्टी (वय ४०, रा. तडवळ, ता. अक्कलकोट) असे अपघातात मरण पावलेल्या डॉक्टरचे नाव आहे. डॉ. आशिष हे रविवारी मिटींगकरिता सोलापुरात आले होते.
NH 30 में देर रात 1 बजे एक भीषण सड़क हादसा हो गया, तेज रफ्तार कार अनियंत्रित होकर पुल से टकरा गई, जिससे कार में आग लग गई, उसमें सवार 4 युवकों की जलकर मौत हो गई, 2 युवक गंभीर रूप से घायल हैं
— Anshuman Sharma (@anshuman_sunona) July 19, 2025
बताया जा रहा कार सवार नशे में थे जो #Kanker की ओर जा रहे थे, आतुर गांव की घटना#Accident pic.twitter.com/ng2x3YD2Se
तेथील मिटींग संपल्यानंतर ते आसरा चौक परिसरात राहत असलेल्या बहिणीच्या घरी काही वेळ थांबले. त्यानंतर रात्री उशिरा ते तडवळ गावाकडे जाण्यासाठी सोलापुरातून कार (एमएच १३ सीएस ०३०८) चालवित निघाले होते. हत्तूर शिवारातून जात असताना, नाईकवाडी यांच्या शेताजवळ त्यांची कार बाजूच्या शेतात पलटी झाली.
हेही वाचा :
लोकप्रिय 7 खाद्यपदार्थ परदेशात पूर्णपणे ‘बॅन’; खाल्ले तर थेट शिक्षीच, कारण वाचून आश्चर्य वाटेल
जगातील सर्वात महागडी क्रिकेट जर्सी! सोन्याने केली डिझाइन; किंमत ऐकून थक्क व्हाल
रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमांत सर्वात मोठा बदल! तात्काळ बुकिंगसाठी ‘ही’ गोष्ट अनिवार्य