रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्यातील अधिकारी आणि रावे पेण येथील राजकीय(new political party) पक्षाचा युवा नेता योगेश बालकृष्ण पाटील (वय ३१ वर्षे) याच्या विरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश बालकृष्ण पाटील याच्यावर एका 30 वर्षीय तरूणीला लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी योगेश बालकृष्ण पाटील याला अटक केली असून त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश बाळकृष्ण पाटील(new political party) हा पेणमधील रावे येथील रहिवासी आहे. तो रायगड जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागात अधिकारी आहे. त्याची पेण येथील रहिवासी असलेल्या ३० वर्षीय तरुणी सोबत २०१८ साली फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्यांच्या ओळखीचं रुपांतर मैत्रित झालं आणि त्यानंतर ते दोघं वारंवार एकमेकांना भेटत होते. आणि भटीचे रूपांतर अखेर प्रेमात झाले. यावेळी आरोपीने पिडीतेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. पिडितेने एप्रिल २०२१ साली जेव्हा योगेश बालकृष्ण पाटील याला लग्नासाठी विचारणा केली असता त्याने नकार दिला.
या संपूर्ण घटनेनंतर एप्रिल २०२२ साली पिडितेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच पिडितेने योगेश याच्यासोबत बोलणं देखील बंद केलं होतं. मात्र तरी देखील योगेशने तिला पुन्हा संपर्क करण्यास सुरवात केली आणि पुन्हा लग्नाचं खोटं आश्वासन दिलं. ३० ऑगस्ट रोजी पीडित तरुणी वाशी येथील व्हि.एल.सी.सी इन्सिटीट्युट येथे गेली असता आरोपी योगेश पाटीलंने या तरुणीला वाशी रेल्वे स्टेशन येथे बोलावलं. त्यानंतर योगेशने पिडीतेला शिविगाळ आणि मारहाण केली आणि तिला वाशी येथे सोडून निघुन गेला. पिडितेने ३० ऑगस्ट रोजी आरोपी योगेश पाटील विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
आरोपी योगेश पाटील याच्यावर भारतीय न्याय सहिता २०२३ कलम ६९, ३५१ (२), ३५२ या कलमांअंतर्गत लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपील न्यायालयात हजर केले असता त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलीस करत आहेत.
याप्रकरणी महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका दीपश्री पोटफोडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितलं की, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना सत्तेचा व पैशाचा माज आला आहे. यामुळेच त्यांची हिंमत महिलांवर अत्याचार करण्याची झाली आहे, अशा या असुरी वृत्तीला ठेचून काढण्याकरिता शासनाने यांच्यावर कठोर कारवाई करावी. तसेच राज्यात दररोज मुली व महिलांवर अत्याचार होत आहेत. राज्याची कायदा व सुव्यवस्था बिघडली असून याची सर्वस्वी जबाबदारी गृहमंत्र्यांची असून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे.
हेही वाचा:
तु फक्त I Love you म्हण, रिचार्ज फ्री; ऑफर देणाऱ्याला महिलांनी शिकवला चांगलाच धडा
लोकसभा निवडणुकीत मतभेद झालेले संजयकाका पाटील आणि विलासराव जगताप एकाच व्यासपीठावर
इचलकरंजीत भाजपचा आक्रमक निषेध: छत्रपतींच्या पुतळ्याच्या अपमानावर महाविकास आघाडीला फटकारले