तुझ्या अंगात भूत शिरलंय’, विधीच्या नावाखाली मांत्रिकाने लॉजवर नेले अन्….

विरारमध्ये एक धक्कादायक(Shocking) घटना समोर आली असून भोंदू बाबाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विरारमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भोंदू बाबाने भूत काढण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी चार तासांतच अटक केली आहे.

पीडित मुलगी अल्पवयीन मुलगी आहे. ती मंदिरात दर्शनासाठी गेली होती. त्यावेळी तिच्या अंगात आले होते ते पाहून तिच्या मित्राने तिला एका भोंदू बाबाकडे नेले. भोंदू बाबाने तिला भूत उतरवण्यासाठी एक विधी करावा लागेल, अशी बतावणी केली. मुलीच्या अंगातील भूत उतरवचो असं सांगत तिला फूस लावल्याची घटना समोर आली आहे(Shocking).या भोंदू बाबाने तिला कारमध्ये बसवून राजोडी बीचवरील एका लॉजवर नेले. तेथे तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात भोंदूबाबसह मित्रावर बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी चार तासातचअटक केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका अल्पवयीन मुलीवर वनरक्षकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रंजीत दुर्योधन असे आरोपी वनरक्षकाचे नाव आहे. पीडित मुलगी कॉलेज सुटल्यानंतर आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून चंद्रपूरहून गावाकडे जात होती. रस्त्यात दुचाकी बंद पडली. दोघेही दुचाकी दुरुस्त करत असताना, चंद्रपूरहून कारवाकडे जाणारा वनरक्षक रंजीत दुर्योधन त्यांच्याजवळ थांबला.

त्याने मुलीच्या मित्राला खोट्या केसमध्ये अडकविण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली. यानंतर, त्याने अल्पवयीन मुलीला पुढच्या गावापर्यंत सोडतो, असे सांगून सोबत घेतले आणि चंद्रपूर-जुनोना मार्गावरील जंगलात घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर, घटनास्थळावरून पसार झाला. पीडित मुलीने पालकांसोबत बल्लारपूर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार केली. पोलीसांनी आरोपी वनरक्षकाला गोंदिया येथून अटक केली आहे. बल्लारपूर पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा :

“पंतला एकटे सोडा” – सचिन तेंडुलकरचे ऋषभबाबत खास विधान
रेल्वे प्रवास होणार स्वस्त, राउंड ट्रिप तिकिटांवर मोठी सूट
QR कोड स्कॅन करा अन् दाखला मिळवा; नागरिकांच्या चकरा आता होणार बंद