रात्रीच्या वेळी रस्त्यावर श्वानांची मोठी दहशत पाहायला मिळते. (street )भटक्या कुत्र्याची ही दहशत आपल्यासाठी काही नवीन नाही. रात्रीचा अंधार, शांतता आणि अचानक भुंकणाऱ्या कुत्र्यांची फौज हे दृश्य तुम्ही अनेकदा पाहिले असेल. अशात यावेळी कुत्र्यांच्या या फौजेला जर कुणी एकटं फिरताना दिसलं तर लगोलग ते त्यांच्यावर हल्ला करू पाहतात. सध्या अशीच एक घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे ज्यात अमृतसरच्या रस्त्यावर एक नाट्यमय हल्ल्याचे दृश्य दिसून आले. कुत्र्यांच्या टोळीने एकट्या व्यक्तीला बघत त्याला चारही बाजूंनी घेरले आणि त्याच्यावर हल्ला करायला सुरुवात केली. मात्र यानंतर व्यक्तीने जे केलं ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. चला व्हिडिओत पुढे काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
व्हायरल व्हिडिओमध्ये, कुत्र्यांच्या टोळीने एका माणसाला घेरत त्याच्यावर हल्ला केल्याचे दिसून आले ज्यानंतर व्यक्तीने स्वतःला वाचवण्यासाठी एक अनोखा मार्ग निवडला ज्याने सर्वच आश्चर्यचकित झाले. हा व्हिडिओ अमृतसरच्या पुतलीघर भागातील आहे. जिथे एक माणूस रात्रीच्या अंधारात खांद्यावर बॅग लटकवून चालत होता. व्हिडिओमध्ये पाहून आपल्या घरी परतत असल्याचे समजते. तितक्यात रस्त्यावरून जाताना भटक्या कुत्र्यांच्या एका गटाने त्याला जंगलातील सिंहांसारखे घेरले. सुरुवातीला व्यक्ती शांत राहिला त्याला वाटले (street )असेल की हे कुत्रे काही करणार नाही मात्र कुत्र्यांनी सर्व बाजूंनी घेरल्यानंतर तो जरा घाबरला आणि त्याने आपल्या पँटचा बेल्ट काढत हवेत तो बेल्ट हलवू लागला. कुत्र्यांना घाबरवण्यासाठी तो आपला बेल्ट हवेत झेलवतो आणि श्वानांना दूर करू पाहतो. शेवटी देवदूताप्रमाणे एक कारचालक तिथे येतो आणि आपली कार श्वानाच्या गटाकडे वळवतो ज्याने ते घाबरतात आणि दूर पळून जातात.
View this post on Instagram
हा व्हायरल व्हिडिओ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘पुतलीघर परिसरात भटक्या कुत्र्यांनी एका वाटसरूला मारहाण केली, तो त्याच्या बेल्टने स्वतःचे रक्षण करण्याचा प्रयत्न करतो’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपल्या (street )प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “रेकॉर्डिंग करण्याऐवजी, त्या व्यक्तीची मदत करायला हवी होती” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “गाडी चालकाबद्दल आदर वाढला”.
हेही वाचा :