वसई: मित्रांच्या ग्रुपला धबधब्यावर(waterfall) पिकनिकला जाणं जीवावर बेतलं आहे. डोहात दोन जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. काल सोमवारी वसईच्या चिंचोटी धबधब्यावर पिकनिकसाठी गेले होते. त्यावेळी पोहत असतांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही मुलं डोहात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी धबधब्यापर्यंत(waterfall)दोन तासाची पायपीट करत जाऊन, एकाला पाण्यामध्ये बुडून तर दुसऱ्याला गाळाच्या साहाय्याने बाहेर काढण्यात यश आले आहे. मृतकाचे नाव प्रेम प्रल्हाद शहजराव (वय 22) रा. अशोक नगर काम इस्टेट रॉड गोरेगाव पूर्व, सुशील भारत ढबाले ( वय 24) रा. अशोक नगर काम इस्टेट वालभात रोड गोरेगाव पूर्व असे नाव आहे.
गोरेगाव कॉलेजमधील ६ जणांना ग्रुप काल वसईच्या चिंचोटी धबधब्यावर(waterfall) पिकनिक बनविण्यासाठी आला होता. या धबधब्यावर हे ६ जण पोहायला गेले. त्यावेळी पाण्याचा प्रवास अचानक वाढल्याने चार जण कसे बसे बाहेर निघाले आणि २ जणांचा डोहात बुडून मृत्यू झाला. याबाबत नायगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे. पाच तासांच्या शोध मोहिमेनंतर दोन तरुणांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.
घटनेनंतर त्यांच्या मित्रांनी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील बापाने पोलीस चौकी येथे पोहोचून माहिती दिली. तो भाग निर्जन होता त्यामुळे त्याठिकाणी मदतीसाठी कुणी नव्हतं असं मुलांनी सांगितलं. घटनेची माहिती मिळताच अग्निशाम दलाच्या मदतीने घटनास्थळी जाऊन शोध घेतला.
सुमारे ५ तास शोधमोहीम सुरु होती. संध्याकाळी ६ च्या सुमारास दोन्ही बेपत्ता तरुणांचे मृतदेह आढळल्याची माहिती, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळाराम पालकर यांनी दिली. यामध्ये अन्य ४ तरुण सुखरूप बचावले तर दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, मुंबईतून एक धक्कादायक आणि अमानवी घटना समोर आली आहे. कर्ज न फेडल्याने दोन तरुणांसोबत चार जणांनी अमानवी कृत्य केलं आहे. केवळ पैसे वेळेवर न दिल्याने या दोघांना मुखमैथुन करायला लावले असल्याचा संतापजनक प्रकार उजेडात आला आहे. एवढंच नाही तर त्यांनी पीडित तरुणांना निर्वस्त्र केले आणि त्यांचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली आहे.
पीडित तरुणांपैकी एक अल्पवयीन असून १९ वर्षीय तरुण आहे. या घटनेननंतर पीडित मुलांपैकी एकाच्या आईने थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेला प्रकार सांगून तक्रार दाखल केली. या संतापजनक घटनेने खळबळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा :
देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार, तारीख अन् ठिकाण झालं फिक्स, वाचा सविस्तर
सपाट पातळीवर होणार शेअर बाजाराची सुरुवात! ‘हे’ स्टॉक्स गुंतवणूकदारांसाठी ठरणार फायद्याचे
महाराष्ट्रामधील Ola ची 385 शोरूम अचानक बंद… लाखो ग्राहकांना बसणार मोठा फटका