प्रत्येक जीवाचं आपापल्या साम्राज्यात वर्चस्व असतं आणि इथे जर तुम्ही गेलात तर तुमची काही खैर नाही. जंगलात जसं जंगलाचा राजा म्हणजे सिंह राज्य करतो तसेच समुद्रात शार्क(shark) माशाची दहशत पाहायला मिळते. आपल्या भल्यामोठ्या शरीरमुळे आणि तीक्ष्ण दातांमुळे समुद्रात सर्व जीव-जंतू त्याला घाबरून असतात.

माशाची शिकार कधी साधी नाही, त्याची ताकद पाहता तो कोणत्याही माशालाच काय तर माणसांनाही खायला मागे पुढे बघत नाही अशात नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे दिसून आले आहे ज्यात शार्क (shark)माशाने चक्क एका जिवंत माणसाला गिळंकृत केल्याचे दिसून आले. व्हिडिओतील ही दृश्य फारच भयानक असून मृत्यूचा हा थरार आता इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एक शार्क समुद्रात पोहणाऱ्या माणसाचा पाठलाग करत आहे. तो माणूस शार्कपासून सुटण्यासाठी धडपडत आहे. तो वेगाने पोहताना दिसतो, पण तो शार्क माशाच्या या राज्यात तो असहाय्य ठरतो आणि शेवटी शार्क त्या माणसाला आपला शिकार बनवतो. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते की शार्क त्या माणसाला जिवंत चावतो आणि क्षणातच तिथले पाणी रक्ताने लाल पडते.
व्हिडिओमध्ये असेही दिसते की शार्क पाण्यात असलेल्या माणसाच्या शरीराचे अवयव चावून चावून खात आहे, पण तरीही व्यक्ती स्वतःला वाचवण्यासाठी पोहत राहिला, पण अखेर जिवंत राहण्याची ही धडपड फार काळ टिकत नाही आणि त्याचा पाण्यातच शेवट होतो. ही भयानक घटना जवळच्या बोटवरील लोकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आणि याचाच व्हिडिओ आता शेअर करण्यात आले आहे.
In Egypt you have to watch out for sharks. pic.twitter.com/GOH8MHH04T
— RadioGenoa (@RadioGenoa) July 19, 2025
दरम्यान ही घटना जून २०२३ मध्ये इजिप्तमधील लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या हुरघाडा समुद्रकिनाऱ्यावर घडली होती, जिथे २४ वर्षीय व्लादिमीर पोपोव्ह, जो इजिप्तचाच होता, तो समुद्रात पोहत होता, तेव्हा अचानक एका वाघाच्या शार्कने त्याच्यावर हल्ला केला. व्लादिमीरने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु शार्कच्या ताकदीसमोर तो असहाय्य दिसला.
घटनेच्या वेळी तेथे उपस्थित असलेल्या लोकांच्या मते, काही सेकंदातच शार्कने व्लादिमीरला आपला शिकार बनवले. हल्ल्यानंतर, स्थानिक बचाव पथकाने त्वरित कारवाई केली आणि शार्कला पकडून किनाऱ्यावर आणण्यात आले, परंतु तोपर्यंत व्लादिमीरचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा :
बंगालमध्ये का टाळली जाते ही खास डाळ? कारण ऐकून थक्क व्हाल
खळबळजनक! ठाकरे गटाच्या बड्या नेत्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल
शॉकिंग! रुग्णालयातील तरुणीला नशेखोर तरुणाकडून बेदम मारहाण; शिवीगाळ करत विनयभंग