PCOS असलेल्या महिलांच्या स्वीट क्रेविंगसाठी खास गिल्ट-फ्री अन् नो-बेक रेसिपी! पाहा कसे बनवायचे ‘कुकी डो बार्स’

PCOS friendly gluten-free dessert ideas: तुम्हाला गोड खायला आवडतं,(dessert) पण PCOSमुळे वजन कमी करणं जरा अवघड वाटतंय? मग हा लेख तुमच्यासाठीच आहे! वजन कमी करत असताना बहुतेक वेळा गोड खाण्यावर बंदी घालावी लागते. पण नेहमीच “नको” म्हणणं शक्य नसतं आणि तसं करणं गरजेचंही नाही!

गोड खाण्याची आवड सांभाळत, शरीराला पोषण देणारी आणि वजन कमी (dessert)करण्याच्या या प्रवासात मदत करणारी एक झकास रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलोय ती म्हणजे कुकी डो बार्स! ही रेसिपी केवळ चविष्टच नाही, तर फायबर, हेल्दी फॅट्स आणि प्रोटीनने भरलेली असल्यामुळे वजनावर नियंत्रण ठेवतानाही तुम्ही गिल्ट-फ्री गोड खाऊ शकता. चला तर मग, झटपट तयार होणारी ही हेल्दी स्वीट ट्रिट ट्राय करूया!

साहित्य
कुकी डो बेससाठी
1.5 कप गव्हाचे पीठ (Wheat flour)

1/2 कप पीनट बटर

1/2 कप मॅपल सिरप

1/4 कप नारळ तेल

1-2 ड्रॉप व्हॅनिला सिरप

थोडंसं मीठ

1/2 कप डार्क चॉकलेट चिप्स

चॉकलेट लेयरसाठी
1 कप चॉकलेट चिप्स

1/4 कप पीनट बटर

कृती
एका प्लेन डिशवर शक्यतो मायक्रोवेव्हसाठी योग्य डिश किंवा ट्रेवर बटर(dessert) पेपर किंवा पार्चमेंट पेपर ठेवा. पेपर नीट राहण्यासाठी आधी तूपाने थोडं ग्रीस करून घ्या.

वरील सर्व बेससाठी लागणारं साहित्य एकत्र करून व्यवस्थित मिक्स करा आणि ट्रेवर पसरवून घ्या.

दुसऱ्या भांड्यात चॉकलेट चिप्स आणि पीनट बटर एकत्र करून मायक्रोवेव्हमध्ये ३० सेकंदाच्या अंतराने गरम करत-करत मिक्स करा. (यासाठी डबल बॉयलर पद्धत वापरू शकता.)

हे मिक्स बेस लेयरवर ओता.

आता हे फ्रीजरमध्ये ठेवा आणि नंतर गरजेनुसार स्लाइस कापून फ्रीजरमध्येच स्टोअर करा.

हेही वाचा :

उबाठा सेनेत बेरजेचे नव्हे तर वजाबाकीचे राजकारण

सावधान! घरात मांजर पाळताय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड

चॉकलेटसाठी हट्ट केल्यावर जन्मदात्याने चार वर्षीय लेकीला संपवलं; पळून जात असतांना अटक…..