रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील एका व्यक्तीने(human) खेड भोस्ते घाटातील एका मृतदेहाची चौकशी केली असता त्याला स्वप्न पडले होते. त्यामुळे बुधवारी सायंकाळी सापडलेल्या मृतदेहाच्या प्रकरणात नवा वळण आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील एका व्यक्तीने आपल्याला स्वप्ने पडत असल्याचे पोलिसांना सांगितले.
रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील भोस्ते घाटात एका पुरुषाचा सापळा आणि कवटी तसेच झाडाच्या फांदीवरती लोंबकळणारी दोरी बुधवारी (18 सप्टेंबर) सापडल्याने खळबळ उडाली आहे. मात्र आता या प्रकरणाला वेगळेच वळण आलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील एका व्यक्तीला या ठिकाणी मृतदेह असल्याचे स्वप्न पडले, त्याने ते खेड पोलिसाना सांगितले. त्यावरुन हा रहस्यमय सापळा आणि कवटीचे गूढ उकलले आहे.
एका व्यक्तीला(human) स्वप्न पडलं आणि त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीच्या आधारे नोंद पोलिसांच्या एफआयआरमध्ये सुद्धा करण्यात आली आहे. पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरनुसार, 17 सप्टेंबर 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील आजगांव येथे राहणारे योगेश पिंपळ आर्या (वय 30 वर्ष) हे खेड पोलीस स्थानकात आले. ‘मला वारंवार स्वप्न पडतात. त्यामध्ये खेड रेल्वे स्टेशनसमोर एका डोंगरात पुरुषाचे प्रेत असल्याचं दिसतं. तो पुरुष माझ्या स्वप्नात येऊन आम्हाला मदत करा असे सांगत आहे,’ असं योगेश यांनी पोलिसांना सांगितलं.
योगेश यांच्या म्हणण्यावर पोलिसांनी विश्वास ठेवला आणि या परिसराची तपासणी सुरु केली. पोलिसांच्या या तपासाणीदरम्यान त्यांना भोस्ते घाटातील जंगलात एका आंब्याच्या झाडाजवळ कुजल्यासारखा वास येत होता. पोलिसांनी जवळ जाऊन पाहिलं तर एका
आंब्याच्या झाडाच्या फांदीला काळ्या रंगाची वायर व प्लास्टिकच्या पट्टया बांधलेले व टॉवेलने बांधून गळफास घेतलेल्या अवस्थेतील अनोळखी व्यक्तीचे(human) प्रेत दिसले. हे प्रेत झाडाला बांधलेल्या अवस्थेत खाली पडलेले दिसले. या प्रेतावर राखाडी रंगाचे जॅकेट, राखाडी रंगाची पँट होती. अनेक दिवसांपासून हा देह इथे असल्याचं त्याचा सापळा दिसत होतं यावरुन स्पष्ट झालं.
या मृतदेहाच्या पायाजवळच काळ्या रंगाची ‘आदिदास’ असं लिहिलेली सॅक आढळून आली. या मृतदेहापासून 5 फुटांवर एक कवटी सापडली. तर मृतदेहाच्या दोन्ही ढोपराजवळ ‘ए.आय.आर’ कंपनीचे कळ्या रंगाचे बूट सापडले. मात्र मृतदेहाजवळ सापडलेल्या सॅकमध्ये पोलिसांना मृतदेहाची ओळख पटवणारे कुठलेच ओळखपत्र किंवा पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे ही आत्महत्या की घातपात याचा तपास खेड पोलिसांनी सुरु केला आहे.
मृतदेहाची अवस्था पाहता अनेक दिवसांपासून मृतदेह पडून होता. मात्र याची कोणालाच माहिती नव्हत, सावंतवाडी येथील एका व्यक्तीला स्वप्नात जाऊन ”मला मदत करा” ही व्यक्ती सांगते आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टींचा उलगडा होतो. सावंतवाडीतील एका युवकाला आपल्या मृत्यूची बातमी स्वप्नात येऊन देतो आणि त्यावरून स्थानिक पोलीस मृतदेह शोधतात, ही गोष्ट विचार करायला लावणारी असून एकंदरच हा सगळा आश्चर्यकारक प्रकार समोर आला आहे. आता या खळबळजनक प्रकारानंतर या मृत्यूचे गूढ उकलण्यात या सगळ्याच विस्मयकारक घटनेत खेड पोलिसांना यश येतं का हे पाहावे लागणार आहे.
हेही वाचा:
कंगना पुन्हा नको ते बोलली; भाजप नेत्याने दिला थेट इशारा
शक्तीपीठ महामार्गावरून राजू शेट्टी आक्रमक; रक्ताचे पाट वाहतील पण…
मद्यप्रेमींसाठी खूषखबर, सरकारचा निर्णय नेमका काय?