मुंबईतील मदनपुरा परिसरात एक दोन मजली इमारत कोसळली

देशाबरोबरच राज्यातील राजकीय घडामोडींचे क्षणोक्षणाचे अपडेट्स, त्याचसोबत दिवसभरातील ताज्या घडामोडींचा धावता आढावा वाचकांना या ठिकाणी अगदी मोजक्या शब्दांमध्ये पाहता येईल. आज मुंबईतील रंगशारदा सभागृहात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिका-यांचा मेळावा होणार असून राज ठाकरे त्यांच्या पदाधिका-यांना मार्गदर्शन करणार आहेत. अलमट्टी धरणाप्रकरणी केंद्र सरकारसोबत चर्चा करण्यातही महाराष्ट्राचं शिष्टमंडळ आज दिल्लीत जाणार आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची उद्या बीडच्या विशेष न्यायालयामध्ये सुनवणी होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार संतोष बांगर यांनी आयोजित केलेल्या कावड यात्रेनिमित्त सोमवारी हिंगोली येथे येणार आहेत. दिवसभरातील सर्वच घडामोडींचे ताजे अपडेट्स या ठिकाणी पाहता येतील.मुंबईतील मदनपुरा परिसरात एक दोन मजली इमारत कोसळली असून आतापर्यंत या घटनेत कोणीही जखमी(Injured) झालेलं नाही. मुंबई पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी उपस्थित आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणावर सुनावणी. पुढील सुनावणी 18 ऑगस्टला होणार. वाल्मिक कराडच्या संपत्ती जप्तीवर अद्याप निर्णय नाही. वाल्मिकच्या जामीन अर्जावर देखील निर्णय नाही. 18 ऑगस्टला निर्णय होण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगर शहरात आजपासून पुन्हा एकदा अतिक्रमण कारवाई होणार आहे. आज नारेगाव परिसरातील रस्ता मोकळा होणार आहे. गरवारे मैदानाजवळील जयभवानी चौक ते मनपाचे डंपिंग ग्राउंड हा 30 मीटरचा रस्ता मोकळा होणार आहे.

कारवाईच्या वेळी 20 जेसीबी, 10 पोकलेन 15 टिप्पर, 2 रुग्णवाहिका, 2 कोंडवाडे, 2 फायर ब्रिगेड वाहने, 200 पोलिस कर्मचारी, 350 मनपाचे कर्मचारी असा फौजफाटा असणार आहे(Injured). तर कारवाईसाठी नारेगाव परिसरात जेसीबी आणि मनपा पथक दाखल झाला आहे. काही वेळात कारवाईला सुरवात होईल, तर विरोधही होण्याची शक्यता आहे.झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे वयाच्या 83 व्या वर्षी दीर्घ आजारानंतर निधन झालं आहे. दिल्लीतील श्री गंगा राम हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

रामटेक तालुक्यातील नगरधन येथे कारवरील नियंत्रण सुटून कारचालकाने 25 ते 30 लोकांना कट मारला. संबंधित व्यक्ती दारूच्या नशेत कार चालवत होता. त्यामुळे त्याने 25 ते 30 लोकांना कट मारली. संतप्त गावकऱ्यांनी पाठलाग करत त्याला चांगलाच चोप दिला. कोथरुडमधील मुलींना मारहाण प्रकरण तापलं. तक्रारीसाठी मुलींचं 12 तासांहून अधिक काळ आयुक्तालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरु आहे. आमदार रोहित पवार, सुजात आंबेडकरही सहभागी झालेत.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष न्यायालयामध्ये सुनवणी होणार आहे. या सुनावणीसाठी स्वतः सरकारी वकील उज्वल निकम उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सुनावणीमध्ये वाल्मिक कराडच्या संपत्ती जप्तीच्या अर्जावर निर्णय होण्याची शक्यता आहे. बीडच्या न्यायालयामध्ये आज संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने प्रकरण चार्ज फ्रेम होऊ शकते.

अलमट्टी धरणाप्रकरणी केंद्र सरकारसोबत चर्चा. महाराष्ट्राचं शिष्टमंडळ उद्या दिल्लीत जाणार. शिष्टमंडळात सर्वपक्षीय 12 लोकप्रतिनिधींचा समावेश. केंद्रीय मंत्री सी आर पाटलांसोबत बैठक होणार. अलमट्टीची उंची वाढवू नये अशी महाराष्ट्र सरकारची मागणी. 519 वरून 524 फूट धरण करण्याचा कर्नाटक सरकारचा प्रयत्न तर धरणाची 15 फूट उंची वाढविली तर पूर येईल आणि नुकसान होईल. महाराष्ट्रातील आमदार खासदारांचं म्हणणं. नवीन महाराष्ट्र सदनात 12 वाजता आमदार खासदारांची होणार बैठक.

हेही वाचा :

“इंजेक्शन घेतलंस का रे तू?” शुभमन गिल आणि आकाश दीप यांच्यातील संवाद स्टंप माइकमध्ये कैद
या शेतकऱ्यांना २००० नव्हे तर ७००० मिळाले; तुम्हाला आले का? वाचा सविस्तर
संतापजनक! शाळेत जात असतांना बळजबरीने गाडीत बसवलं, विनयभंग केला, पाईपने मारहाण केली