सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे नेहमीच अनेक (death)अजब-गजब गोष्टी व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ कधी आपल्याला हसवतात, कधी थक्क करतात तर कधी अचंबित करून जातात. आताही इथे अशीच एक घटना व्हायरल झाली आहे, ज्याने संपूर्ण इंटरनेट हादरून गेला. व्हिडिओमध्ये एका महिलेने मुलाला जन्म दिला असल्याचे समजते मात्र यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ११ वर्षांपूर्वीच तिच्या नवऱ्याचे निधन झाले होते, ज्यामुळे तिला हा मुलगा कसा झाला हा प्रश्न सर्वांना पडला. यातही आणखीन एक धक्कादायक बाब म्हणजे महिलेला आपण गर्भवती कसे राहिलो हेच माहिती नाही. व्हिडिओत जेव्हा तिला याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने असे काही उत्तर दिले की ऐकून सर्वांच्याच पायाखालची जमीन हादरली. चला काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.

या व्हायरल व्हिडिओमध्ये एक रिपोर्टर महिलेला काही प्रश्न विचारताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती महिला सांगत असल्याचे दिसत आहे की तिच्या पतीच्या निधनाला ११ वर्षे झाली आहेत. यावर रिपोर्टर त्याला विचारतो, ‘मग हे मूल कसे जन्माला आले?’ या प्रश्नाचे उत्तर देताना त्या महिलेने सांगितले की तिला हे मूल कसे जन्माला आले हे माहित नाही. महिला इथेच थांबली नाही आणि तिने पुढे अनेक खळबळजनक खुलासे केले (death)ज्याने संपूर्ण सोशल मीडिया हादरून गेलं. महिलेने सांगितले की तिचा नवरा तिच्या स्वप्नात येतो. यावर रिपोर्टर प्रश्न विचारतो, ‘स्वप्नात आल्यावर ते काय करतात?’ ती बाई उत्तर देते की ते जेवण मागतात, जेवण खातात, भांडतात आणि जवळ येऊन झोपतात.
यावर रिपोर्टर म्हणतो की, तुमचा नवरा ११ वर्षांपूर्वी वारला आणि तुम्ही ११ वर्षांनी मुलाला जन्म देत आहात, हे कसं शक्य आहे? यावर ती महिला म्हणते की मला माहित नाही, फक्त देवालाच माहित आहे. यावर रिपोर्टर म्हणतो की, तुमच्या बाबतीत विज्ञानही अपयशी ठरले आहे. तर यावर ती महिला म्हणते की हो, मला ठाऊक नाही की माझ्या पोटात बाळ कसं तयार झालं. रिपोर्टर पुढे विचारतो की आपण समोर जे मूल पाहत आहोत ते स्वप्न आहे की वास्तव? तर ती स्त्री म्हणते की, मूल खरोखर अस्तित्वात आहे. म्हणून रिपोर्टर विचारतो की हे कोणाचे मूल आहे, तर(death) ती महिला म्हणते की हे कोणाचे मूल आहे हे मला माहित नाही. मी कोणाशीही संपर्क साधला नाही.

महिलेचे हे दावे अनैतिक असून यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हा व्हायरल व्हिडिओ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून अनेकांनी याच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तिच्याही गरजा आहेत. हा मुद्दा का आहे आणि त्याची थट्टा का केली जात आहे?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तिच्या स्वप्नात नवरा, अच्छा”.
हेही वाचा :
वैष्णवी हगवणे प्रकरण भोवले! रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र
डोनाल्ड ट्रम्पचे ‘Air Force One’ जगात भारी; राजेशाही थाट पाहून तुमचेही डोळे दीपतील
हॉटेलमधून चेक आउट करताना रुममधील ‘या’ 5 वस्तू घरी घेऊन जाऊ शकता