बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय गेल्या काही वर्षांपासून वेगळे(divorce) राहत असल्याच्या चर्चा आहेत. त्यांच्यात काहीतरी बिनसलं असल्याचं बोललं जातंय. आधी सासू सासऱ्यांसोबत राहणारी ऐश्वर्या आपल्या लेकीसोबत वेगळी राहत असल्याचं सांगण्यात येतंय.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्यालादेखील संपूर्ण बच्चन कुटुंब एकत्र आलं होतं. मात्र ऐश्वर्या तिच्या मुलीसोबत वेगळी आली. त्यावरून पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी त्यांच्या घटस्फोटाबद्दल भाष्य करण्यास सुरुवात केली. मात्र आता अभिषेकने सोशल मीडियावर केलेल्या एका गोष्टीमुळे त्यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चांवर जवळपास शिक्कमोर्तब झालं आहे.
अंबानींच्या लग्नसोहळ्याला ऐश्वर्या आणि अभिषेक वेगवेगळे आले. नंतर भलेही ते एकत्र बसले तरीही त्यांनी एकत्र एकही फोटो काढला नाही. त्यामुळे बच्चन कुटुंबीयांमध्ये आणि ऐश्वर्यात काहीतरी बिनसल्याचं स्पष्ट दिसून आलं. आता अभिषेकने सोशल मीडियावर एक पोस्ट लाइक केली जी घटस्फोटाशी संबंधित होती. त्यामुळे त्यांचा खरंच घटस्फोट होतोय असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. त्याने ही पोस्ट लाइक करत आपल्या भावनांना वाट करून दिली आहे असं नेटकरी म्हणत आहेत.
हिना खंडेलवाल या युझरने पोस्ट केली एक पोस्ट अभिषेकने लाइक केली. या पोस्टमध्ये लिहिलं आहे, ‘घटस्फोट(divorce)कुणासाठीही सोपा नाही. म्हातारपणी रस्ता ओलांडताना हात पकडलेल्या वृद्ध जोडप्यांचे हृदयस्पर्शी व्हिडीओ तयार करण्याची किंवा आनंदाने जगण्याचं स्वप्न कोण पाहत नाही? तरीही, कधी कधी आयुष्य आपल्या अपेक्षेप्रमाणे घडत नाही. परंतु, अनेक दशकं एकत्र राहिल्यानंतर, लहान-मोठ्या गोष्टींसाठी एकमेकांवर अवलंबून राहून त्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनून जेव्हा लोक वेगळे होतात, तेव्हा ते याला कसे सामोरे जातात? असं काय आहे जे त्यांना घटस्फोट घेण्यासाठी प्रवृत्त करतं आणि त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो? या प्रश्नांवर ही कथा भाष्य करते.’
अभिषेकने या पोस्टला लाइक केलं आहे. त्यामुळे तो खरंच घटस्फोट घेतोय हे स्पष्ट आहे असं नेटकरी म्हणत आहेत. ते फक्त लोकांना दाखवायला एकत्र येतात अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.
हेही वाचा :
ब्रेकअपनंतर मलायका पुन्हा प्रेमात? मिस्ट्री मॅनसोबतच्या फोटोमुळे चर्चांना उधाण
गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल कडून आषाढी एकादशी निमित्त शाबू खिचडीचे वाटप
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिल्लीतून घेण्यात आला मोठा निर्णय