मुंबई : आजवर अनेक चित्रपट तसंच मालिकांमधून तिने(photo) आपल्या अभिनयाची मोहोर रसिक प्रेक्षकांच्या मनात उमटवलेली अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या नव्याकोऱ्या आगामी सिनेमाची “फुलवंती” या नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. मनोरंजन विश्वात स्वतःचं वेगळं स्थान असणारे पॅनोरमा स्टुडिओज आणि वेगवेगळ्या कलाकृतींमधून आपला ठसा उमटविणारी चतुरस्त्र अभिनेत्री प्राजक्ता माळी हे संयुक्त विद्यमाने ‘फुलवंती’ ही भव्य कलाकृती घेऊन रसिकांच्या भेटीला येत आहेत.
ही पॅनोरमा स्टुडिओजची आजवरची सर्वात मोठी मराठी चित्रपट(photo) निर्मिती ठरणार असून अभिनेत्री प्राजक्ता माळी यानिमित्ताने चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करीत आहे. नुकतंच या चित्रपटाच्या बाबतची एक पोस्ट तिने शेअर केलीये. हा व्हिडीओ पोस्ट करत प्राजक्ताने कॅप्शनमध्ये लिहीलंय की, ”ओंकारा, दृश्यम, रेड, दृश्यम 2, शैतान आणि बरेच काही, हिंदी, मराठी, पंजाबी, गुजराती भाषांमधील 650+ हून अधिक चित्रपटांचे वितरक यांच्याशी हातमिळवणी करणे; आमच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी “पॅनोरमा स्टुडिओ” – “फुलवंती”.
पॅनोरामाचा पहिला बिग-बजेट ऐतिहासिक मराठी आणि शिवोहमचा पहिला चित्रपट निर्मिती. पहिली नेहमीच खास असते. या क्षणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द पुरेसे नाहीत. “पेशवे युग, नृत्य आणि संगीत” ची जादू तुमच्यापर्यंत आणण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. आशीर्वाद आणि प्रेमाचा वर्षाव करत राहा. मात्र सध्या चर्चा आहे प्राजक्ताच्या लग्नाची. नुकतीच प्राजक्ताने अजून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्याने लोकं तिला तिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारत आहेत. मात्र शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्री लग्नाबाबत स्पष्टच बोलली आहे.
शेअर केलेल्या पोस्टमध्ये प्राजक्ताने कॅप्शन दिलंय की, 23 एप्रिल 2024 रोजी सर्वात आवडत्या, बहुप्रतिक्षित document वर सही केली. #longdue (विवाह रजिस्ट्रेशन नाही, अजिबात नाही.) या क्षणी माझं हृदय कृतज्ञतेने भरलं आहे. #कृतज्ञ #फुलपाखरे उद्या भेटू. #staytune #prajakttamali. त्यामुळे प्राजक्ताने लग्नाचे पेपरवर सही केली नसून तिने नव्या सिनेमा साईन केल्याचं समोर आलं आहे.
अनेकांनी प्राजक्ताच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकाने कमेंट करत लिहीलं की, प्राजु अशीच smile दे पिल्लु आपल्या लग्नात marriage certificate वर sign करताना. तर अच्छा म्हणजे आता अमुल पोस्टरवर त्या मुलीच्या जागी तुमचा फोटो दिसणार… तर अजून एकाने लिहीलंय, मला वाटल मॅरेज सर्टिफिकेट वर सही करत आहेस की काय? माझा जिव वाचवण्यासाठी आभार. अशा अनेक प्रकारच्या कमेंट्स सध्या युजर्स या पोस्टवर करत आहेत.
हेही वाचा :
इचलकरंजी येथील पंचगंगेतील गाळ काढण्यासंदर्भात होणार लवकरच कार्यवाही!
कोल्हापूर, सांगली, अहमदनगर इथं जोरदार पावसाला सुरुवात; ‘या’ जिल्ह्यात लवकरच कोसळणार
मी कुठल्या पाटलाच्या मागे हे 4 जूनला समजेल : विश्वजीत कदमांनी सांगलीचे पत्ते उघड केले