अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला(patient) बरेच दिवस रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवावे लागते, परंतु आता तो कालावधी कमी करण्यात यश आले आहे. लिव्हर प्रत्यारोपणानंतर रुग्णाला आठवडाभरात डिस्चार्ज देता येणार आहे. मुंबईतील वोक्हार्ट रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या देशातील पहिल्या अर्ली रिकव्हरी प्रोग्रॅममुळे हे शक्य झाले आहे.
वोक्हार्ट रुग्णालयात(patient) अंचू रिमो यांच्यावर नुकतीच लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली. त्यांची पत्नी टिना टाकू यांनी लिव्हर दान केल्याने हे शक्य झाले. 17 एप्रिल रोजी ही शस्त्रक्रिया झाली आणि रिमो यांना 23 एप्रिल रोजी डिस्चार्ज देण्यात आला.
आतापर्यंत जगभरात 700 लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करणारे डॉ. टॉम चेरियन यांच्या नेतृत्वाखाली हा अर्ली रिकव्हरी प्रोग्रॅम राबवण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत शस्त्रक्रियेवेळी अत्यंत काळजीपूर्वक आणि सूक्ष्मातील सूक्ष्म बाबींचे अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने योग्य नियोजन करण्यात येत असल्याने रक्तस्राव अत्यल्प प्रमाणात होतो. अत्याधुनिक ड्रेनेज प्रणालीची त्याला जोड मिळते. परिणामी रुग्णाला नव्याने रक्त देण्याची गरज भासत नाही आणि रिकव्हरीचा कालावधी कमी होतो, असे या उपक्रमाचे केंद्र प्रमुख डॉ. वीरेंद्र चौहान यांनी सांगितले.
हेही वाचा :
इचलकरंजीत आज तिनही उमेदवारांकडून पदयात्रा
मुख्यमंत्री कोल्हापुरात ठाण मांडून बसलेत, तरीही मी निवडणूक जिंकणार : राजू शेट्टी
शेवटच्या दिवशी कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांचा रोड शो; भर उन्हात हजारो शिवसैनिक रस्त्यावर