मराठी सिनेसृष्टीची ‘अप्सरा’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी(flirtation) या नाही तर त्या कारणांमुळे नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर सक्रीय असणारी सोनाली तिचे नवनवीन प्रोजेक्ट, फोटोशूट, व्हिडीओ पोस्ट करत असते. सोनाली कुलकर्णी वेस्टर्न वेअरमध्ये जितकी सुंदर दिसते तितकीच सुंदर ती साडीमध्ये देखील दिसते.
नुकताच सोनाली कुलकर्णीने मरामोळ्या लूकमधील(flirtation) काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. सोनाली कुलकर्णीच्या नथीचा नखरा पाहून चाहते चकीत झाले आहेत. या फोटो आणि व्हिडीओमध्ये ती खूप सुंदर दिसते. पण नाकामध्ये घातलेल्या नथीने सोनालीची पंचायत झाली आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोनाली कुलकर्णीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर निळ्या रंगाच्या साडीमधील काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. मराठमोळा साज शृंगार केलेली सोनाली यामध्ये खूपच सुंदर दिसत आहे. सोनाली कुलकर्णीने लाल रंगाची काठ असेलली निळ्या रंगाची साडी नेसली आहे. तिने गळ्यामध्ये सोन्याचे दागिने, कानात झुमके आणि नाकामध्ये सुंदर नथ घातली आहे. सोनालीच्या या नथीनेच सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
नाकामध्ये नथ घातल्यामुळे सोनाली कुलकर्णीला जेवण करता येत नव्हते. त्यामुळे खाताना मध्येच येणारी नथ बाजूला करून सोनाली घास तोंडात घालत होती. या नथीमुळे सोनालीला जेवताना त्रास सहन करावा लागला. पण नथ घातल्यानंतर जेवण कसे करावे याचा उत्तम पर्याय सोनालीने व्हिडीओच्या माध्यमातून दाखवला आहे. सोनालीच्या या फोटो आणि व्हिडीओवर कमेंट्स करत चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.
सोनाली कुलकर्णीच्या या व्हिडीओला पसंती देत नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले की, ‘याचच कन्फुजन होते की जेवायचं कसं. आज क्लिअर झाले.’ दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, ‘आता जेवण कसं करायचं असा प्रश्न पडला होता आणि तू उत्तर दिलं…धन्यवाद’ तर इतर नेटकऱ्यांनी ‘नाकापेक्षा नथ मोठी’, ‘नाकापेक्षा नथ जड’, ‘नाकापेक्षा मोती जड’, अशाप्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत.
हेही वाचा :
महायुतीला धक्का! ‘या’ नेत्याचा भाजपला रामराम
रेल्वे तिकीटचं नाही तर स्टेशनबाहेर तांदळासह पिठाची स्वस्तात करा खरेदी
Alexaच्या मदतीने मुलीनं वाचवला बहिणीचा जीव; आनंद महिंद्रांनी दिली नोकरीची ऑफर