1000 कोटींच्या यशानंतर रश्मिकाला मिळाला आणखी एक मेगा बजेट चित्रपट, साकारणार बोल्ड भूमिका

1000 कोटींचा सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर रश्मिका(Rashmika) मंदानाला आता आणखी एक मेगा बजेट चित्रपटाची ऑफर मिळाली आहे. या नव्या प्रोजेक्टमध्ये ती बोल्ड आणि वेगळी भूमिका साकारणार आहे. बॉक्स ऑफिसवरील यशानंतर आता रश्मिका मंदानाकडून तिच्या अभिनयाची नवी बाजू पाहायला मिळणार आहे. तिच्या या आगामी चित्रपटाची अधिकृत घोषणा लवकरच होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या ‘जवान’ आणि अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांनंतर रश्मिका आता आणखी एका मेगा बजेट असणाऱ्या चित्रपटामध्ये दिसणार आहे. ज्यामध्ये साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि साऊथचे सुपर डायरेक्टर एटली कुमार एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटाचे नाव AA22xA6 असं ठेवण्यात आले आहे. ज्याबद्दल चाहते देखील खूप उत्सुक आहेत.

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. ज्यामध्ये दीपिका पदुकोण देखील दिसणार आहे. त्यामुळे असे म्हटले जात आहे की हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा आणि सर्वात वेगळा चित्रपट असणार आहे. खास गोष्ट म्हणजे या चित्रपटात रश्मिका(Rashmika) मंदाना एका बोल्ड भूमिकेत दिसणार आहे. रिपोर्टनुसार, रश्मिका मंदाना या चित्रपटात अशी भूमिका साकारणार आहे जी तिने यापूर्वी कधीही साकारली नाही.

‘या चित्रपटातील रश्मिकाचे पात्र पूर्णपणे वेगळे असणार आहे. अल्लू अर्जुनसोबतची तिची ऑनस्क्रीन केमिस्ट्री देखील ‘पुष्पा’ पेक्षा पूर्णपणे वेगळी असणार आहे. असे म्हटले जात आहे की रश्मिकाने लॉस एंजेलेसमध्ये चित्रपटासाठी तिची लूक टेस्ट आणि बॉडी स्कॅन देखील पूर्ण केले आहे. या चित्रपटात रश्मिकासह दीपिका पादुकोण, जान्हवी कपूर आणि मृणाल ठाकूर देखील दिसणार आहे.

रश्मिका(Rashmika) मंदानाचा हा चित्रपट जगभरात अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शन तारखेबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल. चित्रपटाच्या निर्मितीमध्ये कोणतीही कसर सोडली जाणार नाही आणि 2026 च्या अखेरीस किंवा 2027 च्या सुरुवातीला हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होऊ शकतो असा अंदाज आहे. ‘पुष्पा 2’ नंतर पुन्हा एकदा रश्मिका मंदानाला पाहण्यासाठी चाहते देखील खूप उत्सुक आहेत.

हेही वाचा :

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेदरम्यान आली दुःखद बातमी

सावधान! राज्यात पावसाचा जोर वाढणार, ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा

देशातील अनोखे मंदिर जिथे जाताच लोकांना मिळते सरकारी नोकरी; दूरदूरवरून भाविक येतात दर्शनासाठी