‘पलक तिवारीला कडेवर उचलणारा मुलगा आहे तरी कोण?’ Viral Video

मुंबई – सध्या ‘द भूतनी’ या आगामी हॉरर कॉमेडी चित्रपटाबद्दल बरीच चर्चा आहे. मंगळवारी संध्याकाळी चित्रपटाचा संगीत लाँच सोहळा पार पडला, ज्यामध्ये चित्रपटातील सर्व कलाकारांनी भाग घेतला. संजय दत्त आणि माॅनी रॉय यांच्याव्यतिरिक्त, पलक तिवारीनेही या चित्रपटाच्या गाण्याच्या लाँचला हजेरी लावली होती. मात्र, पलक येथे पोहोचताच तिला गर्दीने घेरलं. पलकला(actress) तिच्या गाडीतून खाली उतरणं देखील कठीण झालं आणि एका मुलाने तिला कडेवर घेऊन खाली उतरवलं.

पलकचा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चर्चेत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये, पलकला तिच्या गाडीतून बाहेर पडताना खूप त्रास होत असल्याचं दिसून येत आहे. खरंतर, तिच्या गाडीभोवती चाहत्यांची गर्दी जमलेली दिसते. दरम्यान, एक माणूस पलकला गाडीतून खाली उतरण्यास मदत करताना दिसतो.

तो पलकला(actress) खाली आणण्यासाठी तिच्याकडे हात पुढे करतो, ज्याच्या मदतीने ती उडी मारून खाली येताना दिसते. आता लोक या एन्ट्रीवर आश्चर्य व्यक्त करत आहेत आणि सोशल मीडियावर अभिनेत्रीला अनेक प्रश्न विचारले जात आहेत.

एका युजरने विचारलं, ‘हा मुलगा कोण आहे जो तिला कडेवर उचलून घेत आहे आणि खाली उतरवत आहे? इतक्या गर्दीत पलक खूपच छान दिसत आहे, तिच्या या वागण्याचं खूप कौतुकही केलं जात आहे.’ एकाने म्हटलं, ‘खरं सांगायचं तर, बॉलिवूडच्या सर्व स्टार किड्सच्या तुलनेत पलक ही सर्वात गोंडस मुलगी आहे.’

‘द भूतनी’मध्ये सनी सिंग, पलक तिवारी, मौनी रॉय, आसिफ खान हे देखील आहेत. असं म्हटलं जात आहे की, ही सामान्य भूतकथा नाही, तर ‘भूतनी’ ही खऱ्या भीतीने, भयंकर अ‍ॅक्शनने आणि हास्य-विनोदीने भरलेल्या रोलरकोस्टरसारखी आहे. हा हॉरर-कॉमेडी चित्रपट १ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.

दरम्यान, पलकने(actress) ‘बिजली बिजली’ या तिच्या पहिल्या म्युझिक व्हिडिओने प्रसिद्धी मिळवली होती, ज्यामध्ये हार्डी संधू देखील होता. तिने आदित्य सीलसोबत ‘मांगता है क्या’ नावाच्या आणखी एका म्युझिक व्हिडिओमध्येही काम केलं आहे. तिने मोठ्या पडद्यावर एन्ट्री केली असून ती सलमान खानसोबत ‘किसी का भाई किसी की जान’मध्ये दिसली होती.

हेही वाचा :

दुधाच्या किमतीत २ रुपयांची वाढ, आजपासून नवे दर लागू

7 वर्ष लहान रणबीर कपूर सोबत प्रेमसंबंध अनेक वर्षांनंतर अमीषा म्हणाली आम्ही दोघांनी एकत्र

‘गर्दी करा तरच गाईन…’ नेहा कक्करचं ‘ते’ रडगाणं नाटकी? इवेंट प्लॅनर्सकडून सेलिब्रिटीचा भांडाफोड