भारतीय संघाने १७ वर्षांनंतर आयसीसी टी-२० वर्ल्डकप च्या(video call) जेतेपदावर नाव कोरलं आहे. स्पर्धेतील फायनलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. सामन्यातील शेवटचा चेंडू पडताच भारतीय संघातील खेळाडू जल्लोष साजरा करताना दिसून आले.
खेळाडूंसह राहुल द्रविडचे डोळेही पाणावले(video call). दरम्यान या सामन्यानंतर विराट कोहली आपल्या कुटुंबासोबत व्हिडिओ कॉलवर बोलताना भावुक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
भारतीय संघाची आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची प्रतीक्षा संपल्यानंतर भारतीय खेळाडूंना अश्रू अनावर झाले. भारतीय संघातील खेळाडू मैदानात जल्लोष करत होते. तर दुसरीकडे विराट कोहलीने आपल्या घरी व्हिडिओ केला. व्हिडिओ कॉलवर तो आपली पत्नी अनुष्का शर्मासह वामिका आणि अकाय कोहलीसोबत संवाद साधताना दिसून आला. ज्यावेळी तो व्हिडिओ कॉलवर बोलत होता त्यावेळी विराट कोहलीच्या डोळ्यात अश्रू होते. मात्र अश्रू आवरत तो अकायसोबत व्हिडिओ कॉलवर मस्ती करताना दिसून आला.
व्हिडिओ कॉलवर त्याने मुलांना फ्लाइंग किस दिली. काही वेळानंतर त्याने आपल्या कुटुंबाला पुन्हा एकदा फोन केला. ज्यात तो आपलं मेडल दाखवताना दिसून आला. हे भावुक करणारे क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आणि याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
omg Virat Kohli on a video call with Anushka Sharma, he is so happy rn pic.twitter.com/hb1tWSVxWP
— so June 29, 2024
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर,भारतीय संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना विराटने सर्वाधिक ७६ धावांची खेळी केली आणि संघाची धावसंख्या १७६ वर पोहोचवली. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ ७ धावा दूर राहिला.
हेही वाचा :
शरद पवार गटाच्या नेत्यासह ५ जणांविरोधात गुन्हा दाखल
एकनाथ शिंदे अन् अजितदादांबद्दल भाजपच्या बैठकीत मोठा निर्णय
काल घडले, ते उद्या घडेल? पवार म्हणतात नक्की घडेल!