सध्या सोशल मीडियावर एका वडिलांनी आपल्या मुलाला मोबाईल देण्यापूर्वी तयार केलेला करारनामा प्रचंड व्हायरल होत आहे. (mobile )‘मुलांना मोबाईल देण्यापूर्वीचा करार ’ या नावाने ही नियमावली प्रसिद्ध झाली असून, त्यामध्ये एकूण २० स्पष्ट नियम आहेत जे मोबाईल वापराच्या शिस्तीवर आधारित आहेत.या करारनाम्यात असे नमूद आहे की, मोबाईल हा शैक्षणिक किंवा संपर्कासाठी वापरण्यास आहे, पण कोणत्याही अकारण, अपशिष्ट किंवा व्यसनात्मक वापरासाठी नाही. विशेषतः रात्रीचा मोबाईल वापर, अभ्यासाच्या वेळेत व्यत्यय, अज्ञात मित्रांशी संवाद, वाहन चालवताना मोबाईल वापर, किंवा बिनकामाच्या अॅप्स व सोशल मीडियावर वेळ वाया घालवण्यास मनाई आहे.
मोबाईलचा उपयोग शैक्षणिक किंवा संपर्कासाठीच करायचा आहे.
रात्री अभ्यासाच्या वेळेनंतर (mobile )मोबाईल वापर करता येणार नाही.
ड्रायव्हिंग करताना किंवा कोणत्याही वाहनावर असताना मोबाईल वापरण्यास सक्त मनाई.
कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फोटो टाकण्यापूर्वी पालकांची परवानगी आवश्यक.
चुकीचे मेसेज पाठवले गेल्यास ब्लॉक केले जाईल.
फोन हरवल्यास किंवा चोरी गेल्यास जबाबदारी वापरणाऱ्याचीच.
या नियमांचे उल्लंघन केल्यास मोबाईल ताबडतोब परत घ्यावा लागेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. (mobile )या करारनाम्याच्या शेवटी आई, वडील व पाल्याच्या सहीची जागा ठेवण्यात आली आहे, जेणेकरून प्रत्येक गोष्टीला कायदेशीर व शिस्तबद्ध स्वरूप मिळावे.हा करारनामा पाहून अनेक पालकांनी सोशल मीडियावर आपली सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “सध्याच्या मोबाईलमय पिढीसाठी अत्यंत उपयुक्त आणि काळाची गरज वाटणारी ही कल्पना आहे,” असे अनेक पालकांनी म्हटले आहे.
हेही वाचा :