दोन मेगाबजट चित्रपटांना नकार देणारी दीपिका साऊथच्या ‘या’ सुपरस्टारसोबत झळकणार

लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन आणि अ‍ॅटलीचा आगामी चित्रपट ‘AA22xA6’ ची गेल्या आठवड्यातच घोषणा करण्यात आली. चित्रपटाचं नाव आणि पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून सगळीकडे यालाच घेऊन गोंधळ उडाला आहे. शनिवारी निर्मात्यांनी टीझर देखील प्रदर्शित केला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका(Deepika) पदुकोण दिसणार आहे. या चित्रपटात दीपिका ही हटके आणि वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

अ‍ॅटलीच्या एका चित्रपटात दिसणार दीपिका
टीजर में दिखी सिर्फ दीपिका की झलक अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. टीझरमध्ये अभिनेत्री एका योद्ध्याप्रमाणे घोडेस्वारी आणि तलवारबाजी करताना दिसत आहे. ‘AA22xA6’ मध्ये अल्लू अर्जुनला महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. पण टीझरमध्ये त्याची झलक दिसलेली नाही. त्यात फक्त दीपिका आणि अ‍ॅटली हे दोघे दिसले आहेत. यात अ‍ॅटली दीपिकाला(Deepika) त्याच्या या चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकवताना दिसतोय. तर त्यानंतर दोन्ही चित्रपटाच्या सेटवर दिसतात. त्यात तो दीपिकाला तलवारबाजी विषयी समजावताना दिसतोय.

‘AA22xA6’ चं दिग्दर्शन अ‍ॅटली करणार आहे. तर सन पिक्चर्सच्या बॅनर अंतर्गत हा चित्रपट बनवण्यात येत आहे. सन पिक्चर्सनं इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे. तर हा टीझर शेअर करत दीपिकानं प्रोजेक्टचं स्वागत केलं आहे. टीझरसोबत कॅप्शनमध्ये लिहिलं की विजय पथावर राणी. दीपिका पादुकोणचं स्वागत आहे. टीझरमध्ये दीपिकाचा अंदाज पाहून हे स्पष्ट झालं की यावेळी ती पुन्हा एकदा एका दमदार आणि अ‍ॅक्शन पॅक्ट भूमिकेत दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sun Pictures (@sunpictures)

 

टीझरला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळाली आहे. दीपिकाच्या चाहत्यांनी तिला एका नव्या अंदाजात पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे. गेल्या काही काळापासून दीपिकानं चित्रपटसृष्टी सोडली अशी चर्चा रंगू लागली होती. तर सध्या बातमी आली आहे की तिनं संदीप रेड्डी वांगाच्या ‘स्पिरिट’ या चित्रपटातून तिनं स्वत: काढता पाय मागे घेतला आहे. त्यानंतर दीपिका आणि संदीपमध्ये एक शाब्दीप वाद देखील झाल्याचे म्हटलं जाते. आता सध्या हे सगळं प्रकरण शांत झालं असून दीपिका आणि प्रभासच्या ‘कल्कि 2’ मधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. अशात अ‍ॅटलीच्या चित्रपटा दिसणं चाहत्यांसाठी कोणत्याही भेटवस्तू सारखं आहे.

हेही वाचा :