बिग बॉस 18 मधून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री (Actress )ईडन रोज हिने नुकत्याच एका मुलाखतीत भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरबाबत धक्कादायक वक्तव्य केलं आहे. “मी अय्यरच्या दोन मुलांची आई आहे,” असं विधान करत तिने सोशल मीडियावर एकच खळबळ उडवून दिली आहे.
ईडन रोज ही अजून बॉलिवूडमध्ये पदार्पण न केलेली अभिनेत्री(Actress ) आहे, पण ती अनेक इव्हेंट्समध्ये आणि सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. तिला इन्स्टाग्रामवर दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि ती आपले फोटोज, व्हिडिओज शेअर करत सतत चाहत्यांच्या संपर्कात राहते.
“अय्यर माझा पतीच आहे” – ईडनचा भावनिक खुलासा :
ईडनने मुलाखतीत स्पष्ट सांगितलं की, “ती अय्यरच्या प्रेमात पूर्णपणे वेडी झाली आहे” आणि त्याला मनोमन आपला पती मानते. तिच्या मते, “श्रेयस अय्यर हा खऱ्या अर्थाने आदर्श जोडीदार आहे आणि मी मनातून त्याच्याशी लग्नही केलं आहे.” इतकंच नाही, तर ती पुढे म्हणते, “मी त्याच्या दोन मुलांची आईदेखील आहे.”
हे वक्तव्य काल्पनिक असलं तरी, तिच्या भावना आणि आत्मविश्वासामुळे चर्चेला उधाण आलं आहे. सोशल मीडियावर तिचे हे वक्तव्य व्हायरल होत असून, यावर श्रेयस अय्यरची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
अय्यर IPL मध्ये सुपरहिट, पण प्रेमातही ‘Hit’? :
श्रेयस अय्यरने IPL 2025 मध्ये पंजाब किंग्जचे नेतृत्व करत संघाला 11 वर्षांनी अंतिम फेरीत नेले. त्याला 26.75 कोटी रुपयांत विकत घेतलं गेलं होतं, आणि कर्णधारपदही देण्यात आलं. मैदानावर त्याचा परफॉर्मन्स जितका प्रभावी होता, तितकाच तो आता मैदानाबाहेर एका अभिनेत्रीच्या भावना केंद्रस्थानी येण्यामुळे चर्चेत आहे.
ईडनचं वक्तव्य नेमकं PR स्टंट आहे की खरोखरच तिच्या मनातील भावना, यावर सोशल मीडियावर दोन टोकांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जणांनी तिला पाठिंबा दिला आहे, तर काहींनी हे फक्त प्रसिद्धीसाठी केलेलं पब्लिसिटी स्टंट म्हटलं आहे.
हेही वाचा :