अरेच्चा! एका दिवसात २४ तास नसतात.., पृथ्वी विषयी

आपण लहानपणापासून शिकलेलो असतो की, 3सुट्ट्या(holidays)दिवसाला २४ तास असतात. पण सत्य काय जाणून घ्या.
पृथ्वीला सुर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करायला ३६५ दिवस लागतात, ज्याला आपण एक वर्ष म्हणतो. तर स्वतः भोवती प्रदक्षिणा पूर्ण करायाला २४ तास म्हणजे एक दिवस लागतो असं आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. पण तुम्हाला माहित आहे का, की हे एक मिथक आहे. पृथ्वीशी निगडित असे अनेक मिथक आहेत ज्याविषयी ने दिलेल्या वृत्तानुसार आपण जाणून घेऊया.

अर्थ डे च महत्व

अमेरिकेत १९७० मध्ये पर्यावरणाशी निगडीत मुद्द्यांवर जागरुकता आणण्यासाठी सीनेटर गेलॉर्ड नेल्सनने अर्थ डे ची सुरुवात केली. यासाठी त्यांनी कँपेन चालवलं होतं. यामुळे २२ एप्रिलला(holidays)संपूर्ण अमेरिकेतून २ कोटी लोक रस्त्यावर उतरले. आजवर या कँपेनने १८४ दोशात ५००० एन्व्हॉर्मेंटल ग्रुप्स जोडले गेले आहेत.

पृथ्वीशी निगडीत मिथक

एका दिवसात २४ तास – नाही एका दिवसात २३ तास, ५६ मिनीटं आणि ४ सेकंदाचा असतो. एवढ्या वेळातच पृथ्वी आपल्या स्वतः भोवती फिरते.

पृथ्वीवर विज कधीकधीच पडते – नाही तर एका सेकंदात १०० वेळा किंवा एका दिवसात ८६ लाख वेळा सुद्धा विज पडते.

पृथ्वीच्या ७० टक्के भागावर पाणी आहे – पृथ्वीच्या वस्तुमानाच्या फक्त ०.०७ टक्के आणि त्याच्या खंडाच्या ०.४ टक्के भागावर पाणी आहे.

चंद्र नसला तरी पृथ्वीवर फरक पडला नसता – चंद्र जर नसता तर दिवस ६ ते ८ तासांचा असता. एका वर्षात ३६५ नाही तर १००० ते १४०० दिवस असते.

पृथ्वीवरचा सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्ट आहे, ज्याची उंची ८८५० मीटर आहे – माउंट एव्हरेस्टची उंची समुद्र सपाटीपासून ८८५० मीटर आहे. पण पृथ्वीच्या केंद्रापासून अवकाशापर्यंतचं अंतर लक्षात घेतलं तर सर्वात उंच पर्वत इक्वाडेर माउंटचा चिंबोराजो आहे. याची उंची ६३१० मीटर आहे.

हेही वाचा :

पुन्हा छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार नाही, चिन्मय मांडलेकरचा मोठा निर्णय

प्रणिती शिंदेंनी केली भाजपच्या कामाची पोलखोल; ‘मुद्द्याचं बोला ओ’…रॅप सॉंग व्हायरल

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण गरम! राजू शेट्टी यांची कारखानदारांवर जोरदार टीका