महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी.(closed)येत्या 8 आणि 9 जुलै 2025 रोजी राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळा बंद राहणार आहेत. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने पुन्हा एकदा शाळा बंद आंदोलनाचं हत्यार उचलण्यात आलं आहे.या दोन दिवसांच्या आंदोलनात राज्यभरातील हजारो शिक्षक आणि कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानावर एकवटणार आहेत. त्यामुळे राज्याच्या शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे.

गेल्या वर्षभरात सरकारकडून वारंवार आश्वासनं देण्यात आली, (closed)मात्र अनुदानाचा टप्पा, वेतनवाढ आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या अद्यापही तसंच आहेत.2024 मध्ये सलग 75 दिवस राज्यभर आंदोलन झाल्यानंतर मुख्यमंत्री स्तरावर बैठकही झाली आणि काही निर्णय जाहीर झाले. पण 14 ऑक्टोबर 2024 रोजी निघालेल्या GR मध्ये अनुदानाचा उल्लेखच नव्हता. त्यामुळे शिक्षक संघटनांमध्ये प्रचंड असंतोष आहे.
या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ, संयुक्त मुख्याध्यापक महामंडळ, तसेच राज्यातील सर्व प्रमुख शिक्षक संघटनांनी बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 8 आणि 9 जुलै रोजी राज्यातील सर्व प्रकारच्या शाळा बंद असणार आहेत. (closed)विद्यार्थी आणि पालकांनी पुढील शैक्षणिक योजना आखताना या दोन दिवसांचा विचार करावा. तसेच दुहेरी सुट्टीमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होण्याची शक्यता आहे, मात्र शिक्षक संघटनांच्या मते हा लढा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठीच आहे.
हेही वाचा :
पुढील ४ दिवस ‘या’ भागात मुसळधार पाऊस कोसळणार
भारतीय हवाई दलात नोकरीची मोठी संधी! कसा कराल अर्ज? काय आहे पात्रता?
ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटावर अभिषेक बच्चनचं थेट उत्तर; म्हणाला, ‘मी पुन्हा लग्न करतोय…’