नेहमीच भाजी काय बनवावी सुचत नाही? मग झटपट बनवा डाळिंब्यांची उसळ, श्रावणातील पारंपरिक रेसिपी

श्रावण महिन्यात बाजारात भाज्यांच्या किमतींमध्ये मोठी वाढ(vegetables) होते. अशावेळी तुम्ही पारंपरिक पद्धतीमध्ये डाळिंब्यांची उसळ बनवू शकता. हा पदार्थ कोकणातील प्रत्येक घरात उपासवाच्या दिवशी बनवला जातो.

हल्ली प्रत्येकाला सकाळच्या नाश्त्यापासून ते अगदी रात्रीच्या जेवणापर्यंत प्रत्येक वेळी जंक फूड किंवा हॉटेलमधील पदार्थ खाल्ले जातात. पण सतत फास्टफूड, जंक फूड, पॅकेट फूड, फॅन्सी फूड खाल्यामुळे (vegetables) शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होण्याची शक्यता असते. सतत तेलकट किंवा अतिमसालेदार पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आहारात बाहेरील पदार्थांचे सेवन न करता घरी बनवलेल्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. श्रावण महिन्यात सतत शाहाकारी पदार्थ बनवले जातात. त्यामुळे नेहमीच जेवणात भाजी काय बनवावी? हे बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये डाळिंब्यांची उसळ बनवू शकता. डाळिंब्याची उसळ किंवा वालाची भाजी असे सुद्धा म्हंटले जाते. कांदा, टोमॅटो, खोबरं, आलं, लसूण इत्यादी पदार्थांचे चमचमीत वाटण तयार करून भाजी बनवली जाते. चला तर जाणून घ्या डाळिंब्याची उसळ बनवण्याची सोपी रेसिपी.
१० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट लाल भोपळ्याचे भरीत, पावसाळ्यात पचनासाठी ठरेल अतिशय हलका पदार्थ

साहित्य:
भिजवलेले वाल
कांदा
टोमॅटो
लाल तिखट
हळद
गरम मसाला
कोकम
खोबर आणि कांद्याचे वाटण
कोथिंबीर
मीठ
१० मिनिटांमध्ये घरी बनवा लोणावळा स्पेशल चॉकलेट फज,(vegetables) चवीसोबत आरोग्यासाठी सुद्धा गुणकारी

कृती:
डाळिंब्यांची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता आणि हिंग टाकून बारीक चिरलेला कांदा टाका.
कांदा तेलात व्यवस्थित मिक्स केल्यानंतर टोमॅटो आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित दोन्ही पदार्थ मंद आचेवर शिजवा.
त्यानंतर त्यात लाल तिखट, हळद आणि गरम मसाला टाकून मसाले तेलात भाजा.
मसाले खमंग भाजून झाल्यानंतर त्यात कांदा आणि ओल्या खोबऱ्याचं वाटण टाकून तेल सुटतेपर्यंत भाजा आणि थोडस पाणी घाला.
मसाला व्यवस्थित भाजल्यानंतर त्यात साल काढून घेतलेले वाल टाकून आवश्यकतेनुसार कोमट पाणी घालून वाल शिजवून घ्या.
सगळ्यात शेवटी कोकम आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा.
तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली डाळिंब्यांची उसळ. हा पदार्थ गरमागरम चपाती किंवा भाकरीसोबत सुंदर लागतो.

हेही वाचा :

श्रावण अमावस्येच्या दिवशी ‘हे’ उपाय केल्याने मिळेल पितृदोषापासून मुक्ती
दररोज सकाळी रिकाम्या पोटी अंजीरचे पाणी पिण्यास करा सुरुवात, आरोग्याच्या ‘या’ समस्यापासून मिळेल आराम
सोलापूरकरांसाठी खुशखबर! सोलापूर शहरात उभारले जात आहेत 11,000 घरकुलांचे 3 प्रकल्प; ‘या’ संकेतस्थळावर करा अर्ज, 1-BHK घर 11 ते 13 लाखांत तर 2-BHK घर 28 लाखांत