महाराष्ट्राला(Maharashtra) आणखी एक वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. मुंबई सीएसएमटी-नांदेड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ऑगस्ट महिन्यापासून धावणार आहे. 26 ऑगस्टपासून नांदेड-संभाजीनगर- मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. या वंदे भारत एक्स्प्रेसमुळं सात जिल्हे थेट मुंबईशी जोडले जाणार आहेत. मुंबई-नांदेड वंदे भारत एक्स्प्रेस कोणत्या व किती स्थानकांवर थांबणार, व वेळापत्रक कसं असणार, याची सर्व माहिती जाणून घेऊयात.

मुंबई ते नांदेड दरम्यानचं 771 किमीचं अतंर वंदे भारत एक्स्प्रेस 9 तासांत पूर्म करणार आहे.26 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई ते हजूर साहिबा नांदेड वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटनाच्या दिवशी एक विशेष गाडी सोडण्यात येणार आहे(Maharashtra). त्यानंतर 27 ऑगस्टपासून सीएसएमटी ते हजूर साहिब नांदेड आणि 28 ऑगस्टपासून हजूर साहिब नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई अशी धावणार आहे.
कसं असेल वेळापत्रक?
मुंबई ते नांदेड वंदे भारत सीएसएमटीवरुन गुरुवार वगळता दररोज दुपारी 1.10 वाजता सुटेल. त्यानंतर दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, औरंगाबाद, जालना आणि परभणी रेल्वे स्थानकात थांबून नांदेड येथे रात्री 22.50 (10.50) वाजता सुटेल.
नांदेड स्थानकावरुन बुधवार वगळता रोज सकाळी 5 वाजता सुटेल आणि परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, ठाणे, दादर रेल्वे स्थानकांत थांबून सीएसएमटी येथे दुपारी 2.25 वाजता पोहोचेल,
वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर नांदेडकरांचा प्रवास आरामदायी होणार आहे. मुंबई-नांदेड प्रवासाचा कालावधी 9 तास 25 मिनिटे असेल. सध्या नांदेड मुंबई प्रवासासाठी 11 तास लागतात. ही ट्रेन 20 डब्यांची असून 16 एसी चेअर कार आणि 4 एक्झिक्युटिव्ह चेअर कार डब्बे असणार आहेत. सुरुवातीला ही ट्रेन संभाजीनगरपर्यंतच धावत होती. तेव्हा एक्स्पप्रेसला 8 कोच होते पण आता एक्स्प्रेसचा विस्तार केल्याने आणखी 8 डब्बे वाढवण्यात आले आहेत.
किती असेल तिकीट?
मुंबई-नांदेड वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकीट दरांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. मात्र माध्यमांनुसार,, एसी चेअर कारचे तिकीट 1,750 रुपये आणि एक्झिक्युटिव्ह एसी चेअर कारचे तिकीट 3,300 रुपये असू शकते.
कशी असतील स्थानके?
परभणी,जालना, छत्रपती संभाजीनगर, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, ठाणे , दादर या स्थानकात थांबणार आहे.
हेही वाचा :
‘घाबरली होती बेबो’, सैफ अली खाननंतर करीना कपूरवर झाला होता अटॅक,
प्रेमी जोडप्याला जनावरांसारखी वागणूक, गावकऱ्यांनी जे केलं ते अंगावर काटा आणणारं
कॉंग्रेसचा पश्चिम महाराष्ट्रातील माजी आमदार भाजपच्या गळाला; प्रवेशाचा मुहुर्तही ठरला